सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे (bjp) आमदार जयकुमार गाेरे (jaykumar gore) यांना आज (बुधवार) त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) दिलासा मिळाला आहे. आमदार गोरेंनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना येत्या नऊ जून पर्यंत अटक करु नये असे म्हटले आहे. नऊ जूनला त्यांनी सादर केलेल्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी हाेईल. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई नऊ जून पर्यंत टळली आहे. (jaykumar gore latest marathi news)
मायणी येथील मयत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून संगनमताने जमीन हडपण्यासाठी फसवणूक केल्याचा ठपका आमदार जयकुमार गोरे ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्यासह अन्य चाैघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात (dhaiwadi police station) ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी आमदार गाेरेंनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सातारा जिल्ह्यातील वडूज न्यायालयात प्रयत्न केले हाेते. परंतु तेथे त्यांना यश आले नाही. दरम्यान आज (बुधवार) आमदार गोरेंना मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे.
याबाबत वडूजचे डीवायएसपी साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले आमदार जयकुमार गोरे यांना अटकेपासून उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षण मिळाले आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नऊ जूनला सुनावणी हाेईल.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.