satara
satarasaam tv

छत्रपतींंच्या स्वराज्याचे थोरले शाहू महाराजांनी साम्राज्यात रूपांतर केले : वृषालीराजे

आज झालेल्या रक्तदान शिबीरात सातारकरांनी माेठा सहभाग नाेंदविला.

सातारा : स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे कुशल प्रशासक, शंभू पुत्र, सातारा (satara) शहर संस्थापक छत्रपती थोरले शाहु महाराज यांची जयंती आज (बुधवार) विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान छत्रपतींंच्या स्वराज्याचे थोरले शाहू महाराजांनी साम्राज्यात रूपांतर केले अशी भावना वृषालीराजे भाेसले (vrushaliraje bhosale) यांनी व्यक्त केली. (satara latest marathi news)

छत्रपती शाहू महाराज यांची पालखी मिरवणूक संपूर्ण शहरात काढण्यात आली. छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या अदालत राजवाडा (adalat rajwada) येथे छत्रपती परिवाराच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत साहसी खेळांचे प्रात्यक्षिक चौका चौकात सादर करण्यात आले.

satara
'राजे, यांचा डाव ओळखा..! हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही'

या मिरवणुकीत वृषालीराजे भाेसले सहभागी झाल्या हाेत्या. यामुळे शिवशाहू भक्तांचा उत्साह वाढला हाेता. ही मिरवणूक अदालत राजवाडा, समर्थ मंदिर, राजवाडा, मोती चौक, कमानी हौद मार्गे पुन्हा तख्त वाडा (गुरुवार बाग) अशी काढण्यात आली. तेथे वृषालीराजे भोसले यांनी शाहू महाराजांच्या मूर्तीस अभिवादन केले. त्यानंतर रक्तदान शिबिर (blood donation) संपन्न झाले. आज दिवसभरात रक्तदान शिबीरात युवकांनी (youth) माेठा सहभाग नाेंदविला. कार्यक्रमास उपाध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक सुहास राजेशिर्के, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, नगरसेवक अशोक मोने, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारचे अधीक्षक प्रवीण शिंदे तसेच सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक निलेश झोरे यांनी केले. गणेश दुबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कोविड काळात उत्तुंग कार्य केलेल्या वीरांचा सन्मान शाहूनगरी फौंडेशनच्या वतीने करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

satara
SBI च्या एटीएमवर चाेरांचा डल्ला; १७ लाख २१ हजार ९०० रुपये लांबविले
satara
Udayanraje Bhosale: पुणे- सातारा- कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा : उदयनराजे भाेसले
satara
Satara: मालशे पुलाचा 'उद्याेग' उदयनराजेंनी पाहिला; ओढयाचा प्रवाह खूला करण्याचे दिले आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com