Sunita Williams Saam Tv
देश विदेश

Sunita Williams: भारतीय वशांच्या सुनिता विल्यम्स यांनी रचला इतिहास! तिसऱ्यांदा घेतली अवकाश भरारी

Sunita Williams Create History: भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली आहे. सुनिता विल्यम्स या तिसऱ्यांदा अवकाशात गेल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत दोन वेळा अवकाशात भरारी घेतली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांगा सुनिता विल्यम्स अवकाशात गेल्या आहेत. सुनित विल्यम्स या बोइंग स्टारलायनरच्या यानातून अवकाश स्थानकावर पोहचण्याऱ्या त्या पहिल्या अंतराळवीर आहेत. त्यांचे संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे.

बोइंग क्रू फ्लाइट टेस्ट या नावाने कमर्शिल क्रू प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. इंटरनॅशन स्टेशनवर नियमित क्रू फ्लाइटसाठी स्टालाइनर प्रमाणित करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. हे मिशन यशस्वी झाल्यावर ते अंतराळवीरांना अवकाशातील प्रयोगशाळेत नेण्यासाठी आणि तेथून आणण्यासाठी दुसरे खाजगी अवकाशयान बनवेल.

सुनिता विल्यम्सच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा दिवस आहे. सुनिता विल्यम्स यांनी २००६- २००७ साली आणि २०१२ मध्ये सर्वाधित स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर असल्याचा विक्रम केला होता.

सुनिता विल्यम्स जवळपास आठवडाभर अंतराळात थांबतील. स्पेस स्टेशनवर आवश्यक चाचण्या घेण्यात येतील. २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासात ट्रायथलॉन पूर्ण करणारी सुनिता विल्यम्स ही पहिला महिला ठरल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

SCROLL FOR NEXT