Manasvi Choudhary
चांद्रयान मोहीमेनंतर आता इस्रो गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाले आहे.
गगनयान ही मानवयुक्त अंतराळ मोहीम असून २००७ सालीच इस्त्रोने या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात केली होती.
PM मोदींनी गगनयान मोहिमेसाठी पाठवण्यात येणार्या ४ अंतराळवीरांच्या नावाची नुकतीच घोषणा केली.
अंतराळवीर ग्रुप पी. बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर एस. शुक्ला, अशी अंतराळवीरांची नावे आहेत.
गगनयान मोहिमेसाठी निवड झालेले चारही अंतराळवीर भारतीय हवाई दलाचे वैमानिक आहेत.
त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण रशियात झाले असून सध्या बंगळूरमधील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू आहे.
रशियाहून परतल्यानंतर इस्त्रो च्या हूमन स्पेस प्लाईट सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या सिम्यूलेटरवर हे अंतराळवीर सराव करत आहेत.
या मोहिमेअंतर्गत ४०० किलोमीटर कक्षेत हे चारही अंतराळवीर तीन दिवस यानातून परिभ्रमण करतील.
दोन ते तीन दिवस अंतराळात घालवल्यानंतर हे यान समुद्रात उतरवले जाईल.