Israel-Hamas War: इस्त्रायलचा हमासमधील रफाहवर हवाई हल्ला; ४५ जणांचा मृत्यू, २०० हून अधिक जखमी

Isarel Attack On Rafah: इस्त्रायल- हमासचे युद्ध सुरु आहे. या युद्धात आता इस्त्रायलने पुन्हा एकदा हमासमधील रफाह शहरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarSaam Tv

इस्त्रायल- हमासचे युद्ध दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इस्त्रायलने आता रफाह शहरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात जवळपास ४५ लोकांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. इस्त्रायल आणि हमासच्या युद्धाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

इस्त्रायलने रफाह शहरातील काही पॅलेस्टिनी ज्या ठिकाणी राहत होते त्याच ठिकाणी हवाई हल्ला केला. त्यात अनेक नागरिक मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी झाले आहेत. यात अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. यासंदर्भात माहिती देताना पॅलेस्टिनी आरोग्य आणि आप्तकालीन सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्त्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील रफाह शहरावर हवाई हल्ला केले. यात अनेक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हा हल्ला रफाहच्या तेल-अल सुलतान भागात करण्यात आला. तेथे हजारो लोक राहत होते. याआधीही दोन आठवड्यांपूर्वी असाच हल्ला करण्यात आला होता.

याबाबत यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, इस्त्रायलच्या या कारवाईचा मी निषेध करतो. अनेक निष्पाप लोक मारले गेले आहेत. हे लोक युद्धपरिस्थितीत रफाह शहरात आश्रय घेत होते. गाझामध्ये आता कोणतीही सुरक्षित जागात नाही.

Israel-Hamas War
Remal Cyclone: पश्चिम बंगालसहित बांग्लादेशला 'रेमल' वादळाचा तडाखा; १६ जणांचा मृत्यू, २९ हजार घरांचे नुकसान

इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात दोन उच्च पदावर काम करणाऱ्या कमांडर मृत्यूमुखी पडले आहेत. यासीन राबिया आणि खालेद नज्जर अशी या हल्ल्यात ठार झालेल्या कमांडरची नावे असल्याचे इस्त्रायलने सांगितले आहे. इस्त्रायलने हमासला उत्तर देण्यासाठी हा हल्ला घडवून आणला आहे. याआधी हमासने इस्त्रायलव ८ रॉकेट टाकून हल्ला केला होता. त्यानंतर इस्त्रायलने हा हल्ला केला आहे.

Israel-Hamas War
Delhi Home Ministry Bomb Threat: गृहमंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com