दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

Parbhani Farmer’s Hard Work: मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट असताना एका शेतकऱ्यानं आपल्या मेहनतीनं आणि पाण्याचं नियोजन करून भरघोस मिरचीच पिक घेतलं. मात्र त्यालाही सुल्तानी संकटाचा सामना करावा लागला. नेमकं काय झालं मिरचीच? का हा शेतकरी मेटाकुटीला आला? पाहूयात हा रिपोर्ट.........
Parbhani farmer sells green chilli at Rs 2.50 per kg
Parbhani farmer sells green chilli at Rs 2.50 per kgsaam tv
Published On

संपूर्ण राज्यात बळीराजासमोर दुष्काळाचं संकट उभं ठाकलंय. पावसानं दडी मारल्यानं हाता-तोंडाशी आलेली पिकं करपलीयेत, तर पाण्याचाही प्रश्न गंभीर बनलाय. मात्र, या संकटावर मात करत परभणीच्या सेलू तालुक्यातल्या जीवन कवडेंनी एकरभर मिरचीची शेती फुलवली. पाण्याची गंभीर समस्या असतानाही योग्य नियोजनातून जीवन कवडे यांनी 4 क्विंटल मिरचीचं उत्पादन घेतलं. मात्र, एवढ्या भरघोस उत्पादनानंतरही जीवन कवडेंच्या पदरी निराशा आलीय. त्यांनी बाजारात मिरची विकण्यासाठी नेली खरी मात्र त्यांना अडीच रुपये किलोच्या कवडीमोल दरानं मिरची विकावी लागली. नफा तर सोडा त्यांना पदरमोड करावी लागली....

-मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

4 क्विंटल मिरची तोडणीला 2 हजारांचा खर्च

वाहतूक आणि बाजार खर्च 400 रुपये

एकूण खर्च - 2 हजार 400 रुपये

बाजारात विक्री केल्यावर हाती 1 हजार 17 रुपये

उत्पादकाला झालेला तोटा 1 हजार 383 रुपये

रात्रंदिवस मेहनत करूनही उत्पादन खर्च सोडा तोट्यात माल विकावा लागल्यामुळे शेतकऱी पार मेटाकुटीला आलाय.

शेतात घाम गाळून पिकवलेली हिरवी मिरची बाजारात चांगला दर मिळवून देईल, या आशेवर असताना उलट आर्थिक भुर्दंड पडलाय. बाजारात मिरचीची आवक वाढल्यानं व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावानं खरेदी सुरू आहे. कारण साठवणुकीची व्यवस्था नसल्यानं व्यापारी सांगेल त्या भावानं शेतकऱ्याला माल विकावा लागतोय. ऐन दुष्काळात चार पैसे येतील म्हणून फुलवलेल्या पिकातूनही तोटाच होत असेल तर शेतकऱ्यानं जगावं कसं असा प्रश्न उपस्थित झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com