Food Poisoning Case google
देश विदेश

Food Poisoning Case: पाणीपुरी ठरली जीवघेणी! 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 18 जण आजारी

Death By Panipuri: झारखंडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानंतर 18 जण आजारी पडले असून एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अन्नातून विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

Sakshi Sunil Jadhav

पाणीपुरी ही लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे. तिखट-गोड पाण्यांचीही टम्म फुगलेली पाणीपुरी नाश्तासाठी सगळ्यांनाच आवडते. पण पाणीपुरी खाल्ल्याने कोणाचा मृत्यू झाला असेल ही कल्पना सुद्धा किती धक्कादायक आहे. मात्र हेच सत्य आहे. पाणीपुरीमुळे झारखंडमधल्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तसेच १८ हून जास्त व्यक्तींना पोटाच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागलं आहे.

गिरीडीह जवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्टॉलवरून पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर तब्बल 18 हून जास्त व्यक्तींची तब्बेत बिघडली आहे. त्यापैकी एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचं नाव रंजन कुमार आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी इतक्या लोकांना त्रास झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन सतर्क झालं. पुढे सर्व बाधितांना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन गिरिडीहचे उपायुक्त रामनिवास यादव यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले. सध्या तिथल्या अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

प्राथमिक तपासात बरेच दिवस साठवून ठेवलेलं शिळं अन्न खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली. गावात आधीच उन्हाळ्यामुळे अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असताना या घटनेने परिस्थिती जास्त गंभीर झाली आहे. रंजन कुमारच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, आई-वडिलांची अवस्था अत्यंत हालाखीची झाली आहे. तसेच मुंबईत सुद्धा अन्नातून विषबाधेमुळे एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे अन्न सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. आता नागरिकांनी बाहेरील अन्न खाताना जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT