Uttar Pradesh Accident Saam tv
देश विदेश

Accident: भयंकर! एका दुचाकीवरून चौघांचा प्रवास, अपघातामध्ये ३ जिवलग मित्रांनी जागीच सोडले प्राण

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

Summary -

  • एकाच दुचाकीवरून चौघांचा धोकादायक प्रवास

  • भरधाव दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक

  • अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

  • अपघात कुंआडीह गिट्टी प्लांटजवळ झाला

एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ४ मित्रांसोबत भयंकर घडले. त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. उत्तर प्रदेशच्या पश्चिमशरीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंआडीह गिट्टी प्लांटजवळ भयंकर अपघात झाला. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौघे जण एकाच दुचाकीवरून जात होते. दुचाकीचा वेग जास्त होता त्याचवेळी गिट्टी प्लांटजवळ दुचाकीने उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की चौघे मित्र गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिघांना मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाला पुढील उपचारासाठी प्रयागराजला पाठवण्यात आले.

बरैसा गावात राहणाऱ्या श्रीचंद्र (२२ वर्षे), जितेंद्र (२४ वर्षे) हे दोघे जण आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवरून टेवांच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिल्याने हा अपघात झाला. जितेंद्रसह त्याच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीचंद्र गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT