

अमरावतीत घडला भीषण अपघात
उभी ट्रॅव्हलर बस दरीत कोसळताना घडली दुर्घटना
अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू
अमर घटारे, साम टीव्ही
अमरावतीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. अमरावतीत घाटात उभी असलेली ट्रॅव्हलर बस उतारावर दरीत जात असताना गाडी अडवण्याचा प्रयत्नात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिखलदाराच्या घाटात रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
ट्रॅव्हलर बसमध्ये एकाला उलटी आली. त्यामुळे चालकाने बस एका बाजूला लावली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. बस चालकाने ही बस उताराच्या दिशेने उभी केली. त्यामुळे बसमधील प्रवासी खाली उतरल्यानंतर ही बस उताराहून खाली थेट दरीत जाऊ लागली. त्यावेळी चालकाने बसला अडवण्याचा प्रयत्न केला.
ही बस चालकाच्या अंगावरून गेली. या भीषण अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन प्रवाशांनी सुद्धा ती बस ट्रॅव्हलर अडवण्याचा प्रयत्न केला असता दोन प्रवासी सुद्धा जखमी झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्याजवळ एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत चारचाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले आहे. सदर आग शॉर्टसर्किट झाल्याने लागल्याची माहिती समोर येत आहे.
वाहन चालक तात्काळ बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. अकोल्याच्या कापशी येथील सदर चारचाकी वाहन असून वाहन चालक हा दर्यापूरच्या जयनपूर येथे आपल्या नातेवाईकाकडे जात असल्याची माहिती समोर येत आहे. दर्यापूर येथील नगरपालिकेच्या अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.