sonia gandhi
sonia gandhi  saam tv
देश विदेश

Rajsthan Political crisis : राजस्थानमधील राजकीय नाट्यावर सोनिया गांधी नाराज; काँग्रेस गेहलोतांवर काय निर्णय घेणार?

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Rajsthan Political crisis : राजस्थानमधील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे. त्याआधीच त्यांना राजस्थानचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र, त्याच्यानंतर राजस्थानचा 'पायलट' कोण असणार ? यावर सध्या एकमत होताना दिसत नाही.

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर सचिन पायलट यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, अशोक गेहलोत गटाचा पायलट यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये राजकीय नाट्य पाहायाला मिळत आहे. या राजकीय नाट्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी नाराज असून नाट्य करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

राजस्थानमधील नाराजीनाट्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी नाराज झाल्या आहेत. राजस्थानमध्ये नाट्य करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात येणार आहे. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे निकटवर्तीय शांती धारीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

शांती धारीवाल यांनी पक्षाने बोलावलेल्या बैठकीच्या व्यतिरिक्त बैठक बोलावली होती. तसेच या बैठकीतील आमदारांच्या जेवणाची सोय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानमधील आमदारांच्या बंडामागे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असल्याची देखील चर्चा आहे.

राजस्थानचे प्रभारी अजय माकन उद्या मंगळवारी राजस्थानच्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिखित स्वरुपात रिपोर्ट सादर करणार आहे. आज, सोमवारी अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजस्थानमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची १० जनपथवर भेट घेतली. त्यामुळे राजस्थानचा मुख्यमंत्री बदलला जाणार का ? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT