नवी दिल्ली: राजस्थानमधील राजकीय संकट अधिक गहिरं झालं असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर होण्याची शक्यता आहे. मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि दिग्विजय सिंह यांची नावे आता अध्यक्षपदासाठी असल्याची जोरदार चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात आहे. (Ashok Gehlot Congress News)
काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर अशोक गेहलोत यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. मात्र, आता त्यांचं नाव या यादीतून बाहेर पडलं आहे. गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून हटवावे, अशी शिफारस सीडब्ल्यूसीने सोनिया गांधींकडे केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या शर्यतीतून हटवावे, अशी शिफारस काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केल्याचे सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या पक्षातील घडामोडींमुळं सीडब्ल्यूसीचे काही सदस्य नाराज असल्याची चर्चा आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, नाराज असलेल्या सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी गेहलोत यांच्याविरोधात तक्रार केली आहे. माहितीनुसार, गेहलोत यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देणे योग्य नाही. त्यामुळे नेतृत्वानं त्यांच्या उमेदवारीवर पुनर्विचार करावा, असे सदस्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कुणीही लढू शकतं, असं सोनिया गांधी यांनी मागील आठवड्यात म्हटल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. मात्र, गेहलोत यांच्या गटाच्या ९० हून अधिक आमदारांनी राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हाती घेतला. रविवारी रात्रीपासून हे राजकीय नाट्य सुरू आहे. आम्ही राजीनामे दिल्यानंतर काँग्रेसचं सरकार कोसळेल, असे आमदारांना वाटतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.