Raja Raghuvanshi Case Saam Tv
देश विदेश

Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशीला मारल्याची सोनमची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा पहिला फोटो

Sonam Raghuvanshi First Photo With Boyfriend: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपी सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबतचा पहिला फोटो समोर आला आहे.

Priya More

इंदुरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेली राजची बायको सोनमने आपला गुन्हा कबुल केला. सोनमने राजची हत्या केल्याचं एसआयटी समोर कबुल केलं. त्याचसोबत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबतचा पहिला फोटो समोर आला.

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांचा एकत्र असलेला एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये सोनम आणि राज खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोवरून असे दिसून येते की दोघांमध्ये फक्त मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. आतापर्यंत राजचे मित्र आणि ओळखीचे लोक असा दावा करत होते की राज सोनमला दीदी म्हणत होता. पण आता या फोटोवरून सोनम आणि राज यांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि राज यांचा हा फोटो हत्येपूर्वीचा आहे आणि कदाचित तो इंदूरमध्ये कुठेतरी काढला गेला असावा असे सांगितले जात आहे. मेघालय पोलिस आणि इंदूर गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात असे दिसून आले आहे की हत्येच्या काही दिवस आधी सोनम आणि राज यांनी इंदूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकत्र वेळ घालवला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान मेघालय पोलिसांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा यांना समोरासमोर आणले. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले ठोस पुरावे दाखवले आणि पोलिसांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारानंतर सोनम अखेर तुटून पडली. शिलाँग पोलिसांनी घटनेनंतर सोनमचे मारेकऱ्यांशी झालेल्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्याचसोबत घटनास्थळी सापडलेल्या सोनमच्या शर्टचा फोटोही दाखवण्यात आला. यानंतर सोनम रघुवंशीने एसआयटीसमोर आपला गुन्हा कबुल करत नवरा राजला मारल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

SCROLL FOR NEXT