Raja Raghuvanshi Case : हॉटेलमध्ये रुम नाही म्हणून सोनम आणि राजा सामान सोडून गेले अन्... २२ मेला चेरापुंजीत नेमकं काय घडलं?

Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना चेरापुंजीच्या सोहरा परिसरातील हॉटेल मन्हामध्ये महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे २०२५ रोजी सोनम आणि राजा रघुवंशी या हॉटेलमध्ये पोहोचले होते.
Raja Raghuvanshi Case
Raja Raghuvanshi Casex
Published On

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात आता नवा ट्विस्ट आला आहे. चेरापुंजीच्या सोहरा परिसरात असलेल्या हॉटेल मन्हा येथून पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम आणि राजा रघुवंशी २२ मे २०२५ रोजी हॉटेल मन्हा येथे पोहचले होते. त्यांनी हॉटेलमध्ये रुम बुक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना रुम मिळाली नव्हती.

हॉटेलमध्ये रुम न मिळाल्याने सोनम आणि राजा यांनी त्यांचे सामान हॉटेलमध्ये ठेवण्याची विनंती तेथील कर्मचाऱ्यांकडे केली होती. आमचे सामान तुमच्याकडे ठेवा, आम्ही नंतर परत येऊ, असे दोघे म्हणाले होते. पण सामान सोडून निघून गेल्यानंतर सोनम आणि राजा पुन्हा परतलेच नाहीत, अशी माहिती मन्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली.

Raja Raghuvanshi Case
Shocking : बॉयफ्रेंडच्या प्रेमात विवाहिता झाली वेडी, अनैतिक संबंध लपवण्यासाठी नवरा, सासू आणि मुलांच्या जेवणात टाकलं विष

राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती मिळताच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सोनम आणि राजाचे सामान तात्काळ स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ते सामान जप्त करुन चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सोनम आणि राजाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर देखील ताब्यात घेतले.

Raja Raghuvanshi Case
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार, मुलीची हत्या करत मृतदेह सूटकेसमध्ये भरला अन्... बंगळुरूमधील सूटकेस कांडचं गूढ उकललं

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या गोष्टी आणि सीसीटीव्ही फुटेजची कसून चौकशी केली जात आहे. हे पुरावे हत्येचे गूढ उकलण्यात महत्त्वाचे ठरु शकतील, असा पोलिसांना विश्वास आहे. चेरापुंजीत सोनम आणि राजा कुठे गेले होते आणि त्यांच्यासोबत आणखी कोण-कोण होते हे शोधण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत.

Raja Raghuvanshi Case
Kharghar Crime : खारघर हादरलं! पत्नीची हत्या करुन पतीने स्वत:लाही संपवलं, कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com