Shocking : बॉयफ्रेंडच्या प्रेमात विवाहिता झाली वेडी, अनैतिक संबंध लपवण्यासाठी नवरा, सासू आणि मुलांच्या जेवणात टाकलं विष

Shocking News : विवाहित महिलेने पती, सासूसह दोन्ही लहान मुलांच्या जेवणात विष मिसळले. अनैतिक संबंध लपवण्यासाठी कुटुंबियांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे, तिचा बॉयफ्रेंड सध्या फरार आहे.
Shocking News
Shocking Newsx
Published On

अनैतिक संबंध लपवण्यासाठी एका विवाहित महिलेने पती, सासू आणि दोन मुलांना जेवणात विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर पती आणि सासरकडेचे लोक आक्षेप घेतील या भीतीने महिलेने जेवणात आणि कॉफीमध्ये विष मिसळले होते. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. पण तिचा बॉयफ्रेंड फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या केरलारू गावात एका महिलेने तिच्या संपूर्ण कुटुंबाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेचे नाव चैत्रा असे आहे. चैत्रा आणि गजेंद्र यांचे ११ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत. एकाचे वय १० तर दुसऱ्याचे वय ८ वर्ष आहे. चैत्राचे मागील एका वर्षापासून शिवू नावाच्या परपुरुषाशी अनैतिक संबंध होते.

Shocking News
Viral : 33 वर्षांपूर्वी 'एवढ्या' रुपयांना मिळायची बिअर, नव्वदच्या दशकातील बिअरच्या 'त्या' बिलाचा फोटो व्हायरल

शिवूच्या नात्यावर सासरचे लोक आक्षेप घेतील या भीतीने चैत्राने जेवणात विष मिसळले. विषारी अन्न खाल्यानंतर चैत्राचा पती गजेंद्र, दोन्ही मुलं आणि सासू आजारी पडले. अन्नातून विषबाधा झाली असावी असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. पण जेवणात काहीतरी गडबड असल्याचा संश गजेंद्रला आला. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तपासात चैत्राने अन्नात विष मिसळले असल्याचे स्पष्ट झाले.

Shocking News
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार, मुलीची हत्या करत मृतदेह सूटकेसमध्ये भरला अन्... बंगळुरूमधील सूटकेस कांडचं गूढ उकललं

एसपी मोहम्मद सुजिथा यांनी या प्रकरणाची माहिती दिली. २ जून रोजी गजेंद्र नावाचा माणूस पोलीस स्थानकात आला. त्याने पत्नी चैत्रा आणि तिचा प्रियकर सिव यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये चैत्राने आम्हाला मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी जेवणात विष मिसळले होते असा उल्लेख गजेंद्रद्वारे करण्यात आला. तपासादरम्यान अन्नामध्ये विविष प्रकारची औषधे आणि अन्य पदार्थ मिसळत असल्याचे आढळले. या प्रकरणातील मुख्य आरोपी चैत्राला अटक करण्यात आली आहे, असे एसपी सुजिथा यांनी सांगितले.

Shocking News
अमरावतीत राडा! लिंबाचं झाड का कापलं? म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला, CCTV फुटेज व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com