अमरावतीत राडा! लिंबाचं झाड का कापलं? म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला, CCTV फुटेज व्हायरल

Amravati News : अमरावतीच्या परतवाडा शहरातील रमेश कॉलनीमध्ये एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. लिंबाचे झाड कापण्यावरुन हा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Amravati News
Amravati NewsX
Published On

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. रात्रीच्या सुमारास काही जणांनी पीडित व्यक्तीवर अचानक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका शुल्लक कारणावरुन हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या परतवाडा येथे रमेश कॉलनीत राम बघेल या व्यक्तीवर शनिवारी ७ जून रोजी प्राणघाती हल्ला झाला. लिंबाचे झाड का कापले यासारख्या शुल्लक गोष्टीवर तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण करतानाची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

Amravati News
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार, मुलीची हत्या करत मृतदेह सूटकेसमध्ये भरला अन्... बंगळुरूमधील सूटकेस कांडचं गूढ उकललं

लिंबाचे झाड कापण्यावरुन राम बघेल यांना मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटेजमध्ये काहीजण बाईकवरुन खाली उतरत कोणालातरी मारण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसते. आसपासचे लोक घरातून बाहेर आल्याचे देखील दिसते. मारहाणीदरम्यान काहींनी मध्यस्थी केल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते.

Amravati News
Viral : 33 वर्षांपूर्वी 'एवढ्या' रुपयांना मिळायची बिअर, नव्वदच्या दशकातील बिअरच्या 'त्या' बिलाचा फोटो व्हायरल

मारहाण प्रकरणी परतवाडा पोलीस स्थानकामध्ये आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने तपासाला वेग येईल असे म्हटले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

Amravati News
'कॅपिटल मार्केट'मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com