
बंगळुरूच्या चंदापुरा भागात रेल्वे रुळाजवळ सूटकेसमध्ये १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. मृत मुलगी मूळची बिहारची होती. तिला लग्नाचे आमिष दाखवत कर्नाटकमध्ये आणले होते. २१ मे रोजी तिचा मृतदेह रेल्वे पुलाजवळ सूटकेसमध्ये आढळला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आशिक कुमार (वय ३०) एका कारखान्यात मदतनीस म्हणून काम करत होता. तो काही कामानिमित्ताने बिहारला गेला होता. तेथे आरोपीने १७ वर्षीय मुलीला फसवले, लग्नाचे आमिष दाखवत कर्नाटकमध्ये आणले. त्यानंतर आशिकच्या भावाच्या, मुकेश कुमारच्या घरी मुलीला नेण्यात आले.
भावाच्या घरात आशिक कुमारने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने त्याला नकार दिला. हे सगळं लग्नानंतर असे तिने म्हटले. तेव्हा रागाच्या भरात आरोपी आशिक कुमारने मुलीवर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. आरोपी मुलीच्या पोटावर बसला आणि त्याने गळा दाबून पीडितेची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घडलेली घटना आत्महत्या आहे असे रंगवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मुलीने गळफास लावल्याचा दावा आशिक कुमारने अन्य साथीदारांसमोर केला. घरात गोंधळ असल्याने घरमालकाला संशय आला आणि त्याने घटनास्थळी जमलेल्या लोकांचे फोटो काढले. हेच फोटो आरोपींची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलीच्या हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरण्यात आला. एका कॅबमध्ये बसून आरोपी आणि त्याचे साथीदार रेल्वे पुलाजवळ गेले. तेथे त्यांनी मृतदेह असलेला सूटकेस फेकला. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे मुलीची ओळख पटल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.