Kharghar Crime : खारघर हादरलं! पत्नीची हत्या करुन पतीने स्वत:लाही संपवलं, कारण...

Navi Mumbai Crime: खारघरमध्ये एका पतीने त्याच्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पतीने पत्नीची हत्या का केली आणि स्वत:ला का संपवले याचा पोलीस तपास करत आहेत.
Kharghar News
Kharghar Newsx
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

खारघरमध्ये दुहेरी मृत्यूची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वत:चे आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या संदर्भात तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय होलाराम सचदेव (वय ४५) याने ९ जून (सोमवार) रोजी सकाळी नऊ ते साडेदहा या सुमारास राहत्या घरात पत्नी सपना संजय सचदेव (वय ३५) हिचा धारदार चाकून गळ्यावर, पाठीवर आणि खांद्यावर वार करत हत्या केली. हत्येनंतर संजय सचदेवने स्वत:च्या गळ्यावरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

Kharghar News
Shocking: 'त्याने माझा वापर करून सोडलं', बड्या खासदारावर उच्चशिक्षित महिलेचा गंभीर आरोप; पोस्ट करत पत्ते उघड

पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत:वर चाकूने वार केल्यानंतर संजय सचदेव गंभीररित्या जखमी झाला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात सपनाच्या भावाने खारघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पुढील तपास सुरु केला. पत्नीची हत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Kharghar News
Mumbai News : जेजे रुग्णालयातील MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह

खारघरमधील डॉलफिन प्राईड, सेक्टर ३४ ए येथील एका फ्लॅटमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर प्राणघाती हल्ला केला. धारदार चाकून तिच्या शरीरावर वार केले. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीने स्वत:च्या गळ्यावरुन चाकू फिरवला. गळ्यावर झालेल्या जखमांमुळे पतीचा देखील जागीच मृत्यू झाला. महिलेच्या भावाच्या फिर्यादीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या दुहेरी मृत्यूकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Kharghar News
Crime News : पायात जोडवी, कंपाळावर कुंकू अन् शरीरावर जखमा, हिरव्या सूटकेसमध्ये आढळला विवाहितेचा मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com