Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी प्रकरणात खळबळजनक खुलासा; पतीच्या हत्येनंतर सोनम इंदूरमध्ये आलेली, बॉयफ्रेंड राजसोबत रुममध्ये...

Raja Raghuvanshi Murder Case : २१ मे रोजी शिलाँगला पोहोचल्यानंतर, हे जोडपे २२ मे रोजी चेरापुंजी येथे गेले आणि त्यांनी होमस्टे घेतला. या जोडप्यासोबतच खून प्रकरणातील इतर आरोपींनीही तिथे होमस्टे घेतला.
Raja Raghuvanshi Murder Case Big Breaking
Raja Raghuvanshi Murder Case Big BreakingSaam TV News
Published On

इंदूर : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. मेघालय आणि इंदूरचे पोलीस या हत्येचं गूढ उकलण्यासाठी एकत्र काम करत आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, हत्येनंतर सोनम रघुवंशी २५ मे २०२५ रोजी इंदूरला आली. येथे ती तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत भाड्याच्या खोलीत राहिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशी याला मारण्याची योजना त्यांच्या लग्नानंतर लगेचच आखण्यात आली होती, आणि ही योजना त्याची पत्नी सोनम आणि राज कुशवाह यांनी आखली होती.

२१ मे रोजी शिलाँगला पोहोचल्यानंतर, हे जोडपे २२ मे रोजी चेरापुंजी येथे गेले आणि त्यांनी होमस्टे घेतला. या जोडप्यासोबतच खून प्रकरणातील इतर आरोपींनीही तिथे होमस्टे घेतला, परंतु राजा रघुवंशी याला याची काहीच कल्पना नव्हती.

Raja Raghuvanshi Murder Case Big Breaking
Liquor Price Hike : महाराष्ट्रात दारू महागणार, तळीरामांची झिंग उतरवणारा सरकारचा निर्णय

हत्येनंतर सोनम इंदूरमधील राजकडे गेली

मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, योजनेनुसार तीन आरोपींनी राजाला पकडलं आणि त्यानंतर विकी नावाच्या आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. राजाला मारल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले, परंतु हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. यानंतर सोनम इंदूरला पोहोचली, जिथे तिने राज कुशवाहाशी संपर्क साधला. त्यानंतर सोनम उत्तर प्रदेशला पोहोचली.

आरोपी आकाशच्या जॅकेटवर आढळले रक्ताचे डाग

सोनमने तिच्या हनिमूनचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत, ज्यामुळे संशय निर्माण झाला असता. परंतु गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या खुनी आकाशच्या जॅकेटमुळे तपास सोपा झाला. हे जॅकेट सोनमने आकाशला दिले होते, ज्यावर रक्ताचे डाग देखील आढळले होते. आरोपी विशालने सर्वात आधी राजावर हल्ला केला. त्यानंतर इतर आरोपींनी हल्ला केला.

Raja Raghuvanshi Murder Case Big Breaking
Nanded Crime : घरात घुसून आजीला मारलं, दुर्गंधी आल्याने गावकऱ्यांना समजलं; नांदेडमधील 'त्या' हत्येचं धक्कादायक गुढ उलगडलं

हत्येसाठी वापरलेले शस्त्र गुवाहाटीमध्ये सापडले

गुवाहाटी पोलीस स्टेशनजवळून हत्येत वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी राज कुशवाहाच्या आईने सांगितले की, तिचा मुलगा निर्दोष आहे. तो असे कधीच करू शकत नाही. राज कुशवाहाच्या बहिणीनेही तो सोनमसोबत रिलेशनशिपमध्ये होता हे पूर्णपणे नाकारलं आहे.

Raja Raghuvanshi Murder Case Big Breaking
Ahilyanagar Crime : रीलच्या नादात नको तो आगाऊपणा, गळफास घेतानाचा VIDEO बनवला; अचानक ओढणीचा फास आवळला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com