
मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या राजा सुर्यवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली. राजाची हत्या दुसरं- तिसरं कुणी नसून त्याची बायको सोनमने केली. बॉयफ्रेंडच्या मदतीने सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला. राजाची हत्या करण्यासाठी तिने शूटरला सुपारी दिली होती. लग्नाच्या अवघ्या १२ व्या दिवशी सोनमने नवऱ्याला संपवलं. महत्वाचे म्हणजे, नवऱ्याची हत्या केल्यानंतर सोनमे सोशल मीडियावर त्याच्यासोबत एका फोटो शेअर केला. आता तिच्या या पोस्टची चर्चा होत आहे.
सोनमने नवरा राजाची हत्या करायचे हे साखरपुड्यापासून ठरवलं होतं. लग्न झाल्यानंतर सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत राजाच्या हत्येसाठी कट रचला. ठरल्याप्रमाणे सोनमने राजाला न विचारता हनिमूनसाठी शिलाँगचे तिकीट बूक केले. शिलाँगला गेल्यानंतर तिने नवऱ्याची हत्या केली. तिच्या डोळ्यासमोरच शूटरने राजाला कुऱ्हाडीने वार करत संपवलं. असं देखील सांगितले जात आहे की राजाला सोनमनेच दरीत ढकलले.
सोनम आणि राजा टेकडी चढत असताना ती हळूहळू चालू लागली. यावेळी दोघांसोबत ३ जण म्हणजेच शूटर देखील होते. सोनम मागे आणि राजा पुढे चालत होता. तेवढ्यात सोनम तिथेच थांबली आणि शूटर्सला मारा याला असे सांगितले. सोनमच्या डोळ्यासमोरच तिचा नवरा राजाला संपवण्यात आले. 'तुम्हाला याला मारावच लागेल. तुम्हाला २० लाख रुपये देईन.', असे सोनमने त्या शूटर्सला सांगितले.
राजाची हत्या केल्यानंतर सोनमने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आणि या फोटोवर 'सात जन्माचं नातं', असे कॅप्शन दिले. पोलिस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली. नवऱ्याची हत्या केल्यानंतर सोनमने ड्रग्ज घेतलं आणि कुणी तरी पळवून नेल्याची माहिती पसरवली. सोनमला पोलिसांनी गाझीपूरमध्ये जेव्हा अटक केली तेव्हा देखील ती नशेतच होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.