Raja Raghuvanshi: सोनम रघुवंशी प्रेग्नंट? वैद्यकीय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर, गुढ आणखी वाढलं

Sonam Raghuvanshi: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम रघुवंशी मास्टरमाईंड? गरोदरपणाच्या संशयाने आणखी गूढ वाढलं. वैद्यकीय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर.
Raja Raghuwanshi Murder Case
Raja Raghuwanshi Murder CaseSaam Tv News
Published On

राजा रघुवंशी प्रकरणात पोलीस तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सोमवारी पोलिसांनी सोनम रघुवंशीला यूपीतील गाझीपूर येथून अटक केली. सोनम या प्रकरणात मास्टरमाईंट असल्याचा आरोप केला जात आहे. राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर तीन जणांची नावे समोर आली आहेत. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे, कारण सोनम गरोदर असल्याचं बोललं जात आहे. वैद्यकीय रिपोर्टमुळे हे प्रकरण अधिक गुढ बनत चाललं आहे.

सोनमच्या वैद्यकीय चाचणीतून धक्कादायक माहिती समोर

९ जून २०२५ रोजी ३ महिला डॉक्टरांच्या पथकाने सोनमची वैद्यकीय चाचणी केली. या चाचणीमध्ये सोनमची शारीरिक आणि मानसिक स्थिती कमकुवत असल्याचं आढळून आलं. ती घाबरली होती. मात्र, तिच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, प्रेग्नेंसी टेस्टमधून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सोनम गर्भवती आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी ७ दिवसांनी अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे या प्रकरणात आणखी गुढ वाढलं आहे.

Raja Raghuwanshi Murder Case
Solapur: 'बघून घेईन तुला' धमकी देत जबर मारहाण, दुसऱ्या दिवशी तरूणाचा मृतदेह नदीपात्रात; आत्महत्या की घातपात?

हनिमून ते थेट हत्या

११ मे २०२५ रोजी इंदुरमध्ये दोघांचं लग्न झालं होतं. मात्र, सोनम आपल्या नवऱ्यासोबत खूश नव्हती. तिचं जीव राजामध्ये अडकला होता. २० मे रोजी जोडपं मेघालयात गेले होते. नंतर २३ मे रोजी सोहरामधून दोघेही बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह वैसोडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत आढळला.

Raja Raghuwanshi Murder Case
Pune: कागदावर मोबाईलचा पासवर्ड अन् खोलीत गळफास घेत आयुष्य संपवलं; पुण्यात निवासी डॉक्टरानं उचललं टोकाचं पाऊल

मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. ९ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर सोनम सापडली. तिनं आत्मसमर्पण केलं. मेघालय पोलिसांचा दावा आहे की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहसोबत राजाची हत्या करण्यासाठी आणखी ३ जणांची मदत घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com