Solapur: 'बघून घेईन तुला' धमकी देत जबर मारहाण, दुसऱ्या दिवशी तरूणाचा मृतदेह नदीपात्रात; आत्महत्या की घातपात?

Solapur Crime: मारहाणीनंतर काही दिवस बेपत्ता असलेला सूरज विटकर (धोत्रे), अखेर पुणे जिल्ह्यातील गोदी गावाजवळील नीरा नदी पात्रात मृतावस्थेत आढळला.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

भरत नागणे, साम टीव्ही

धमकीनंतर आणि मारहाणीनंतर अकलूज येथील तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारहाण झाल्यानंतर तरूण बेपत्ता होता. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह गावातील नदी पात्रात आढळला. या घटनेसंदर्भात नातेवाईकांनी आत्महत्या नसून घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

सूरज विटकर (धोत्रे) असं मयत तरुणाचं नाव आहे. तो सोलापुरातील अकलूज रहिवासी आहे. संशयित आरोपी अजय माने याने सुरजला धमकी दिली होती. बघून घेण्याची धमकी देऊन त्याने मारहाणही केली असल्याची माहिती आहे. मारहाणीनंतर तरूण काही दिवस बेपत्ता होता. बेपत्ता झाला असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दिली.

Crime News
OYO Crime: दुरावा वाढला, कपल OYO हॉटेलमध्ये गेले; प्रियकराच्या डोक्यात सैतान घुसला, बंद दाराआड..

तपास केला असता ९ जून रोजी त्याचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील गोदी गावातील नीरा नदी पात्रात आढळून आला. त्यानंतर नातेवाईकांनी आत्महत्या नसून घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी संशय व्यक्त करत अजय मानेला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत असून, पुढील तपास सुरू आहे.

Crime News
Nashik: मुंबई लोकल अपघातानंतर नाशिकमध्ये थरारक रेल्वे अपघात, एक्सप्रेस पकडताना तरूणाचा हात निसटला, अन् रेल्वेखाली..

धाराशिवमधील हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक

"नाद करतो काय?.. यायला लागतंय.." या डायलॉगमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर-धाराशिव रोडवरील हॉटेल भाग्यश्री सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

हॉटेल चालवून स्वतःच्या पत्नीला फॉर्च्युनर एसयुव्ही भेट देणाऱ्या या हॉटेलच्या मालकाची स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे. मात्र, ही चर्चा ताजी असतानाच हॉटेल बंद असताना अज्ञात व्यक्तींनी हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक करत तोडफोड केली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हॉटेल मालकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com