OYO Crime: दुरावा वाढला, कपल OYO हॉटेलमध्ये गेले; प्रियकराच्या डोक्यात सैतान घुसला, बंद दाराआड..

Love Turns Deadly: एक धक्कादायक घटना बंगळुरूमधून समोर आली आहे, प्रेयसीने निर्माण केलेल्या दुराव्यामुळे प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Crime
CrimeSaam
Published On

प्रेमात नेमकं कधी कोणतं वळण येईल हे सांगता येत नाही. प्रेमाचं नातं विश्वासावर आधारलेलं असलं तरी, काही वेळा यातून निर्माण होणारा दुरावा अत्यंत भयानक शेवट घडवतो. अशीच एक धक्कादायक घटना बंगळुरूमधून समोर आली आहे, जिथे प्रेयसीने निर्माण केलेल्या दुराव्यामुळे प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना पूर्णा प्रजना लेआउट येथील एका ओयो हॉटेलमध्ये घडली असून, यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यश (वय वर्ष २५) असे आरोपीचे नाव आहे. तर, हरिनी (वय वर्ष ३६) असे मृत तरूणीचे नाव आहे. दोघेही केंगेरी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची माहिती आहे. डीसीपी लोकेश जगलासर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ वर्षापासून दोघांचं अफेअर सुरू होतं. परंतु गेल्या २ महिन्यांपासून मृत महिला हळूहळू प्रियकरापासून दूर जात होती.

Crime
Mumbai Local: १,२,३,४,५,६... मुंब्रा स्थानकावर मृतदेहाचा खच, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप

दोघांमध्ये प्रेयसी दुरावा निर्माण करत होती. याच गोष्टीचा राग त्याला अनावर झाला. आरोपीने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला. त्याने तिला पूर्णा प्रजना लेआउट स्थित एका ओयो हॉटेलमध्ये नेलं. प्रेयसी देखील त्याच्यासोबत हॉटेलमध्ये गेली. रचलेल्या कटानुसार, त्याने प्रेयसीवर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

Crime
Local Accident: दोन लोकल एकमेकांना घासल्या, दारावर लटकलेल्या प्रवाशांची पाठ सोलली गेली अन् रूळावर पडले; ६ जणांचा मृत्यू

आरोपीने नंतर तेथून पळ काढला. तरूणीचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. बंगळूरूमधील सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com