
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे सेवेत आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान, या दोन्ही धावत्या लोकल एकमेकांच्या जवळून गेल्या. यामुळे फुटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांचा तोल गेला आणि काही प्रवासी खाली पडले. ८ प्रवासी खाली पडले असून, ६ जणांचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ महिला आणि २ पुरूषांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. यापैकी ३ प्रवाशांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. सध्या या थरारक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओ कमेंटकरून या अपघाताचा निषेध करत रोष व्यक्त केला आहे.
ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सीएसएमटीकडे जाणारे अनेक प्रवासी लोकलमधून खाली पडले असल्याची माहिती आहे. ट्रेनमध्ये जास्त प्रवाशांची गर्दी असल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने कळवा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेबाबत मध्य रेल्वेनं एक निवेदन जारी केलं आहे. एएनआयला दिलेल्या निवेदनात, सेंट्रल रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी लोकलमधून पडले. लोकलमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे हा अपघात असल्याची माहिती आहे. रेल्वे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.