Local accident: मुंबईच्या रेल्वे रूळावर मृत्यू तांडव, लोकल अन् एक्सप्रेसचा अपघात; ५ जणांचा मृ्त्यू, १२ जखमी

Diva-Mumbra Train Accident: दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान, पुष्पक एक्सप्रेस आणि एका लोकल ट्रेनमध्ये घर्षण झाल्यामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Accident
AccidentSaam
Published On

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान, पुष्पक एक्सप्रेस आणि एका लोकल ट्रेनमध्ये घर्षण झाल्यामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्राथमिक माहितीनुसार, लोकलच्या दरवाज्याजवळ उभे असलेले प्रवासी घर्षणामुळे खाली पडले. यात १२ प्रवासी ट्रॅकवर पडले असून, त्यातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर येत आहे.

मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी एक्सप्रेस आणि लोकलचा भीषण अपघात घडला. दिवा ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान पुष्पक एक्सप्रेस आणि कसाऱ्याच्या दिशेने जात असलेली लोकल एकमेकांना घासली. यादरम्यान, गाडीतून १२ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. यातील ५जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एक्सप्रेस आणि लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. लोकलमधील प्रवासी दारावर लटकत उभे होते. धावत्या लोकलमधून हे प्रवासी स्थानकावर तसेच रेल्वे रूळावर पडल्याची माहिती आहे.

Accident
Death: हनिमूनसाठी गोव्याला निघाले, बायकोला तहान लागली अन् नवरा स्टेशनवर उतरला; पण ट्रेन पकडताना ट्रेनखाली चिरडला

सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मृत तसेच जखमींना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी ३० - ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे. प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून, काहींचे कपडे फाटले आहेत. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले हे अद्याप समोर आलेले नाही. नेमकी काय घटना घडली, याचा तपास सुरू आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. रेल्वे गार्डनं यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Accident
Badlapur: 'बदलापुरातील पानटपऱ्यांवर ड्रग्ज विक्री' भाजप आमदाराचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com