Breaking News

Badlapur: 'बदलापुरातील पानटपऱ्यांवर ड्रग्ज विक्री' भाजप आमदाराचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP MLA Badlapur: बदलापुर शहरातील पान टपऱ्या आणि चहाच्या टपऱ्यांवर खुलेआम ड्रग्ज विक्री होत असल्याचा धक्कादायक आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.
Badlapur
BadlapurSaam
Published On: 

सध्या ड्रग्ज विक्रीचे प्रमाण वाढत चाललं आहे. तरूणवर्ग ड्रग्जच्या विळख्यात सापडत आहे. कॉलेजची विद्यार्थी सुद्धा ड्रग्जच्या आहारी जात असल्याचं चित्र आहे. अशातच भाजप आमदार किसन कथोरे यांनी गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे. बदलापूर शहरात ड्रग्ज सुळसुळाट असून, पान टपऱ्या आणि चहाच्या टपऱ्यांवर ड्रग्जची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप कथोरे यांनी केला आहे. दरम्यान कथोरे यांच्या आरोपांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना आमदार कथोरे यांनी हा गौप्यस्फोट केला. तसेच बदलापुरात सुरू असलेल्या ड्रग्ज विक्रीबाबत त्यांनी माहिती दिली. "बाहेरून आलेल्या लोकांकडून या ठिकाणी ड्रग्जची विक्री केली जाते. त्यामुळे कॉलेजमधील अनेक तरुण-तरुणी ड्रग्जच्या विळख्यात अडकत आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.

Badlapur
Shocking: फेसबुकवर ओळख अन् लग्नाचं प्रॉमिस, शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ शूट, १२ लाखांना गंडा; आरोपी अटकेत

"मी स्वतः अनेकदा पोलिसांना सांगून कारवाई करायला लावली आहे," असे सांगत त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. कथोरे यांनी या प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आणि ठोस पद्धतीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कथोरे यांनी केलेल्या आरोपांमुळे स्थानिक पोलिस यंत्रणा आणि अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण झाली आहे.

Badlapur
Transgender: लग्न केलं ८ महिने संसार थाटला, नंतर मुलगी निघाली ट्रान्सजेंडर; तरूणानं VIDEO शेअर करत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com