
राजस्थानातील श्री गंगानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ महिन्यांपूर्वी एका ट्रान्सजेंडर व्यक्तीवर एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्यासोबत पळून जाऊन विवाह केल्याचा आरोप होता. दोघांनीही चंदीगड येथील न्यायालयात कोर्ट मॅरेज केले होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीशी तरुणाने लग्न केले, ती व्यक्ती न पुरूष, न स्त्री, न किन्नर तर, ट्रान्सजेंडर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्याने तिच्यासोबत या संसारात खूश असल्याचं सांगितलं.
सध्या सोशल मीडियावर ममता (ट्रान्सजेंडर) आणि दिनेश या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोघांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या इच्छेने लग्न केले असून, ते दोघेही आपल्या संसारात खूश असल्याचं त्यांनी सांगितलं. ममताने सांगितले की, "मी मुलगी नाही, मुलगा नाही, किन्नरही नाही, मी एक ट्रान्सजेंडर आहे, मी लिंग बदलले आहे." दिनेशने देखील हेच सांगितले की, "मी बीए पास आहे, मला चांगलं-वाईट समजतं. माझं ममतावर प्रेम आहे. मी तिच्यासोबत खूश आहे.'
गोगामेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील काही लोकांनी पोलिसांना निवेदन सादर करत अशी तक्रार केली की, "गेल्या काही महिन्यांपासून काही नकली किन्नर गावात येऊन तरुणांना फसवत आहेत. तसेच तरूणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत. देणगी मागण्याचा बहाणा करत ते चुकीच्या हेतूने काम करतात."
त्यानंतर त्यांनी ममतावर दिनेशला फसवून पळवून नेल्याचा आरोप केला. गावकरी अशा घटनांमुळे भयभीत झाले आहेत आणि इतर तरुणही अशा प्रकाराला बळी पडतील, अशी चिंता व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.