Crime News SAAM TV
देश विदेश

Banglore News : २०-२५ सिगारेट ओढल्या, बिअर प्यायली अन् २१व्या मजल्यावरुन मारली उडी, तणावातून इंजिनीअरची आत्महत्या

Banglore Engineer jumps from 21st floor : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंगच्या फ्लॅटमधून आणि मोबाईलमध्ये त्यांना कुठलीही सुसाइड नोट किंवा मेसेज सापडला नाही. सारंग हा फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता.

प्रविण वाकचौरे

Banglore News :

कर्नाटकातील बेंगळुरू आत्महत्येची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारुन जीवन संपवलं आहे. सारंग कुलकर्णी असे मृत इंजिनीअरचे नाव आहे. पोलिसांनी मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

सारंगचे वडील श्रीकांत यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच सारंग याने कामानिमित्त ऑफिसजवळ घर घेतले होते.मात्र सारंग काही दिवसांपासून खूप तणावात होता आणि गेल्या 2 महिन्यांपासून काम देखील करत नव्हता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंगच्या फ्लॅटमधून आणि मोबाईलमध्ये त्यांना कुठलीही सुसाइड नोट किंवा मेसेज सापडला नाही. सारंग हा फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता.

आत्महत्या करण्यापूर्वी सारंगने भरपूर बिअर प्यायली आणि 20-25 सिगारेटचे ओढले असावे, असा पोलिसांना अंदाज आहे. सारंगच्या फ्लॅटमधून पोलिसांना अनेक सिगारेटचे तुकडे आणि बिअरचे रिकामे कॅन सापडले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास सारंगने आत्महत्या केली आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रत्येक बाजून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT