Lonikand Police Station
Lonikand Police StationSaam Tv

Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात जन्मदात्या बापाकडून मुलीवर धारदार शस्त्राने वार, परिसरात खळबळ

pune Latest News In Marathi : पुण्याच्या वाघोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोलीत जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Published on

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News:

पुण्याच्या वाघोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोलीत जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) वाघोलीत वडिलांकडून मुलीवर धारधार शस्त्राने वार केला आहे. जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोके, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे असं पीडित मुलीचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lonikand Police Station
Garlic Price : लसूण ५०० रुपये किलो; आवक घटल्याने भाव गगनाला

पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या मावशीच्या फिर्यादीवरुन लोणीकंद पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. (Pune Latest News)

Lonikand Police Station
Buldhana Crime: वाळू माफियांना दणका! बुलढाण्यात अवैध वाळू वाहतुक करणारे ९ टिप्पर पकडले; १३ जणांना अटक

पतीने डोक्यात कुऱ्हाडीने वार करत पत्नीला संपवलं

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन २५ वर्षीय पत्नीची डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वारजे येथील कर्वेनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पूजा लखन कांबळे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

पत्नीची हत्या करणाऱ्या लखन बालाजी कांबळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पूजा आणि लखन हे जोडपं मुळचं धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहे. कांबळे जोडपे हे पुण्यातील कर्वेनगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून राहत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com