Buldhana Crime: वाळू माफियांना दणका! बुलढाण्यात अवैध वाळू वाहतुक करणारे ९ टिप्पर पकडले; १३ जणांना अटक

Buldhana News: तलाठी परमेश्वर बुरकुल यांच्या फिर्यादीवरून अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे १३ टिप्पर जप्त करून यांचे चालक व मालक अश्या १३ जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Buldhana Crime News
Buldhana Crime Newssaam tv
Published On

संजय जाधव, बुलढाणा|ता. ३ जानेवारी २०२४

Buldhana Crime News:

बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत रेतीची अवैध वाहतुक करणारे ९ टिप्पर पकडण्यात आले आहेत. या वाळू तस्करांकडून एकूण १ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. (Crime News Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत (Andhera Police Station) असलेल्या चिंचखेड परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक होत असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, अंढेराचे ठाणेदार विकास पाटील, चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे, देऊळगाव राजाचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या संयुक्त पथकाने सुलतानपूर चिंचखेड परिसरात धाड टाकली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Crime News
Solapur: बायकोने नवऱ्यावर दाखल केला अॅट्रोसिटीचा गुन्हा, पती म्हणाला, ती माझ्याच जातीची; काय आहे नेमकं प्रकरण?

यावेळी काही टिप्पर अवैध रेती वाहतूक करतांना आढळून आले. या कारवाईत तलाठी परमेश्वर बुरकुल यांच्या फिर्यादीवरून अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे १३ टिप्पर जप्त करून यांचे चालक व मालक अश्या १३ जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमध्ये तब्बल एकूण १ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Buldhana Crime News
Lok Sabha Election : तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार'; लोकसभेसाठी भाजपचा नवा नारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com