Buldhana Corona: बुलढाण्यात कोरोनाची एन्ट्री; आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Buldhana News : राज्यातील अनेक भागात रोज नवीन रुग्ण असल्याचे समोर येत आहे. बुलढाण्यात देखील आज आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
Buldhana Corona
Buldhana CoronaSaam tv
Published On

संजय जाधव 
बुलढाणा
: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने राज्यातील अनेक जिल्ह्यातील भागात एंट्री केली आहे. आज अहमदनगर नंतर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात देखील कोरोनाने एंट्री केली आहे. यात  बुलढाणा शहरातील ४८ वर्षीय आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारीच पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. (Latest Marathi News)

Buldhana Corona
Nandurbar Accident : कंपनीत रुजू झाल्यानंतर पाचव्याच दिवशी मृत्यूने गाठले; सहलीला जाताना कंपनीच्या बसचा अपघात

कोरोनाचा जेएन १ हा नवीन व्हेरिएंट केरळ, गोवा, बिहार, गुजरात राज्यासह महाराष्ट्रात देखील पसरत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामंध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागात रोज नवीन रुग्ण असल्याचे समोर येत आहे. बुलढाण्यात देखील आज आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Corona
Jalna News : शिक्षक द्या, विद्यार्थ्यांची आर्त हाक; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन

  
कोरोनाची लक्षणे जाणवल्याने या ४८ वर्षीय कर्मचाऱ्याने कोरोना (Corona New Verient) रॅपिड टेस्ट केली. त्यात सदर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.  कोरोना संसर्गित रुग्ण बुलढाणा शहरातील चिखली मार्गावर हाजी मलंग दर्ग्याच्या मागे असलेल्या एका नगरात राहतो. त्याला होम आयसोलेटेड करण्यात आले आहे. आता जेएन १ व्हेरियंटच्या तपासणीसाठी नमुने नागपूरला पाठविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com