Nandurbar Accident : कंपनीत रुजू झाल्यानंतर पाचव्याच दिवशी मृत्यूने गाठले; सहलीला जाताना कंपनीच्या बसचा अपघात

Nandurbar News : पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी भीषण अपघात होऊन दोन तरुणी ठार, तर ५७ जण जखमी झाले
Nandurbar Accident
Nandurbar AccidentSaam tv
Published On

नंदुरबार : पर्यटनासाठी जात असताना ताम्हिणी घाटात (ता. मालगाव) झालेल्या बस अपघातात शहादा (Shahada) तालुक्यातील मंदाणे येथील सुरभी रवींद्र मोरे (वय २२) व कांचन मारुती पाटील (२०, रा. सावरगाव गेट, ता. भोकर, जि. नाशिक) या (Accident) दोघांचा मृत्यू झाला. (Maharashtra News)

Nandurbar Accident
Sandipan Bhumre News : राम मंदिर होतेय याला महत्त्व, पैशाला नाही; संदीपान भुमरे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी भीषण अपघात होऊन दोन तरुणी ठार, तर ५७ जण जखमी झाले. (Nandurbar) जखमींमध्ये मंदाणे येथील अन्य दोघांचा समावेश आहे. मंदाणे येथील सुरभी मोरे, लक्ष्मी मोरे यांनी या २० डिसेंबरला पुणे येथील सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथील एसीएच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मुलाखत दिली होती. त्यात त्यांची निवड होऊन ते २४ डिसेंबरला त्या कंपनीत रुजू झाले होते. त्यानंतर पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Accident
Bhandara News : ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका; भंडारा आगाराच्या २५० फेऱ्या रद्द

विवाहापूर्वीच मृत्यूने गाठले

सुरभी व लक्ष्मी या दोघींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे कंपनीची सहल निघाली होती. सहलीच्या स्थळापर्यंत पोचण्याआधीच (Bus Accident) अवघ्या तीन तासांच्या प्रवासानंतर ताम्हिणी घाटात बसचा अपघात झाला. यात सुरभीचा मृत्यू झाला. मृत सुरभी मोरे हिच्यासाठी चांगले स्थळ मिळाले होते. सहलीहून परतल्यावर मंदाणे गावी ती आल्यावर विवाह निश्चित करण्यात येणार होता. त्या अगोदरच क्रूर काळाने झडप घालून सुरभीला हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com