Bhandara News : ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका; भंडारा आगाराच्या २५० फेऱ्या रद्द

Bhandara News : चालकांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्यात येत आहे. चालकांच्या हातून अपघात घडून त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरळ १० वर्षाचा कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा ठेवण्यात येणार आहे.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : केंद्र सरकारने चालकाच्या हातून अपघात झाल्यास १० वर्षाची शिक्षा असा नियम आजपासून लागू केला आहे. या विरोधात राज्यभरात ट्रक चालकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा फटका (MSRTC) एसटी महामंडळाला देखील बसला असून यामुळे (Bhandara) भंडारा जिल्ह्यातील २५० बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. (Tajya Batmya)

Bhandara News
Cotton Price : भाव नसल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवला कापूस

चालकांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्यात येत आहे. चालकांच्या हातून अपघात घडून त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरळ १० वर्षाचा कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा ठेवण्यात येणार आहे. याच्या विरोधात ट्रक चालकांनी नागपूर- कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. ट्रक चालकांनी पुकारलेल्या बंदचा फटका थेट भंडारा आगारातून सुटणाऱ्या बसवर पडला आहे. भंडारा आगारातील नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या सकाळपासून सुमारे २५० बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara News
Sandipan Bhumre News : राम मंदिर होतेय याला महत्त्व, पैशाला नाही; संदीपान भुमरे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

सात लाखांचे नुकसान 

नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या बस (St Bus) फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे सात लाखांचा फटका भंडारा आगाराला बसला असून यात प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. बराच वेळपर्यंत प्रवाशांना नागपूरच्या दिशेने कुठलीही बस मिळाली नसल्याने अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com