Shocking Incident x
देश विदेश

Engineer Death : फ्लॅट पाहण्यासाठी गेला अन् ३१ व्या मजल्यावरुन पडला, इंजिनिअरची आत्महत्या, अपघात की घातपात?

Shocking : भाड्याच्या घराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्देवी मृत्यू झाला. इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरुन पडून त्याने जीव गमावला.

Yash Shirke

  • सॉफ्टवेअर इंजिनिअरचा ३१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

  • भाड्याचा फ्लॅट पाहताना इमारतीतून खाली पडला

  • परिसरात मोठी खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

Shocking Incident :आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या एका २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा उंच इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. हा इंजिनिअर त्याच्या दोन मित्रांसह भाडेतत्त्वावरील फ्लॅट पाहण्यासाठी आला होता. ही घटना गाझियाबादच्या इंदिरापूरममध्ये घडली आहे. या घटनेमुळे सोसायटीत मोठी खळबळ उडाली. त्यानंतर लगेच पोलिसांनी बोलावण्यात आले.

मृत्यू झालेल्या इंजिनिअरचे नाव सत्यम त्रिपाठी असे आहे. नोएडा सेक्टर २ मधील आयटी फर्ममध्ये काम करणारा सत्यम, त्याचा मित्र कार्तिक आणि प्रॉपर्टी एजंट सतपाल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास साया गोल्ड अव्हेन्यू सोसायटीतील फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेले होते. सत्यमची बहीण आणि मेहुण्यासाठी ते भाड्याचे घर बघत होते. त्यावेळेस ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे फ्लॅटची तपासणी करण्यासाठी १५ मिनिटे थांबले होते. निघण्याच्या तयारीत असताना सत्यमला फोन आला. तो खासगीत बोलण्यासाठी मास्टर बेडरूममध्ये गेले. कार्तिक आणि प्रॉपर्टी एजंट त्याची बाहेर येण्याची वाट पाहत होते. बराच वेळ झाला तरी सत्यम बेडरूममधून बाहेर न आल्याने दोघेजण आत शिरले. तेव्हा त्यांना बेडरूममध्ये कोणीही नसल्याचे आढळले.

दोघांनी बाल्कनीमधून खाली पाहिले. खाली लोक जमलेले होते. कार्तिक आणि प्रॉपर्टी एजंट धावत खाली गेले, त्यांना पार्किंग परिसरात सत्यमचा मृतदेह आढळला. ३१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर स्थानिक पोलिसांना संपर्क करण्यात आला. आम्ही सर्व बाजूंनी प्रकरणाचा तपास करत आहोत, असे एसीपी अभिषेक श्रीवास्तव म्हणाले.

सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असताना, अपघात किंवा घातपात याचीही शक्यता तपासली जात आहे. फॉरेन्सिक टीमने फ्लॅटमधून पुरावे गोळा केले असून, त्रिपाठी यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी सत्यमचा मित्र आणि प्रॉपर्टी एजंटचे जबाब घेतले आहेत. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. या प्रकरणी सत्यमच्या कुटुंबीयांनी अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Puri Tips: पुऱ्या फुगत नाहीत, तळल्यावर लगेच तेलकट अन् चपट्या होतात? 1 पदार्थ वापरा, टम्म फुगतील पूऱ्या

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

SCROLL FOR NEXT