Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Crime News : काम देतो असे म्हणत काही अज्ञातांनी एका आदिवासी महिलेला जंगलात नेले. तेथे आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी पीडित महिलेला अमानुषपणे मारहाण केली.
Crime
Crimex
Published On
Summary
  • कामाचं आमिष दाखवून फसवणूक

  • आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार

  • अत्याचारानंतर मारहाण देखील केली

  • उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू

Shocking : कामाचे आमिष दाखवून एका ३३ वर्षीय आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपींनी महिलेला क्रूरपणे मारहाण देखील केली. रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे. ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यामध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेडक जिल्ह्याच्या कोल्चरम मंडळातील आपाजी पल्लीच्या जवळच्या जंगलात ही खळबळजनक घटना घडली. मेडक मंडळाच्या आदिवासी वस्तीतील रहिवासी असलेली पीडित महिला शहरात काम करण्यासाठी निघाली होती. काही अज्ञात पुरुषांनी तिला काम देतो असे सांगत सोबत नेले. सात किमी लांब अंतरावर असलेल्या जंगली भागात त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.

Crime
पुणे जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! घायवळ टोळीनंतर आणखी एक टोळी पुणे पोलिसांच्या रडारवर; मोठी कारवाई

अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडितेचे हात तिच्याच साडीने बांधले. त्यांनी लोखंडी रॉड आणि इतर शस्त्रांनी तिला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमुळे पीडित महिलेच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. महिलेला मारहाण केल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून पळून गेले. पीडिता रात्रभर जंगलात जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत होती.

Crime
Mumbai : हायप्रोफाइल सोसायटीत 'काळेकांड'; सेक्रेटरीनं मर्यादा ओलांडल्या, महिलेला तसले मेसेज पाठवायचा, एकदा नव्हे तर दोनदा...

दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांना पीडिता झाडाखाली आढळली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर डीएसपी प्रसन्न कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडितेला वाहनातून सरकारी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारादरम्यान तिची प्रकृती बिघडली. तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरु असताना पीडितेचा मृत्यू झाला.

Crime
CM : मुलींना रात्री बाहेर जाऊ देऊ नये, सामूहिक बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. पण पीडितेच्या मृत्यूनंतर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) आणि ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आला. तपासादरम्यान पीडितेला काम देतो असे सांगत आरोपींनी सोबत नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Crime
Afghanistan Attack : वाद पेटला! अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, २०० तालिबानी तरुणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com