CM : मुलींना रात्री बाहेर जाऊ देऊ नये, सामूहिक बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

West Bengal : खासगी वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
cm mamata banerjee
cm mamata banerjeex
Published On
Summary
  • पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली.

  • या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.

  • या घटनेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे.

West Bengal News : पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आळी आहे. मूळची ओडिशाची असणारी ही विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसह जेवायला बाहेर गेली होती. तेव्हा अचानक काही अज्ञात पुरुष कॅम्पसजवळ आले. त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. घटनेच्या वेळी तरुणीची मैत्रीण घटनास्थळावरुन पळून गेली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हे एक खासगी महाविद्यालय आहे. ती मुलगी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. रात्री १२.३० वाजता ती बाहेर कशी आली? माझ्या माहितीनुसार, ही घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण जंगल परिसरात आहे. काय घडले ते मला माहिती नाही. चौकशी सुरू आहे. या घटनेने मला धक्का बसला आहे. पण खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही त्यांच्या विद्यार्थ्यांची, विशेषत: मुलींची काळजी घेतली पाहिजे."

cm mamata banerjee
Student Death : सीनियरच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील NDA च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गूढ उकललं?

"मुलींना रात्रीच्या वेळी (महाविद्यालयातून) बाहेर जाऊ नये. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. हे ठिकाण जंगलाच्या परिसरात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोषींना शिक्षा होईल. आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे. आम्ही नक्कीच कठोर कारवाई करु. मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा इतर राज्यांमध्येही अशा घटना घडल्या आहेत. तेथील प्रशासनानेही कठोर निर्णय घ्यायला हवेत. आमच्या राज्यात आम्ही १-२ महिन्यांतच आरोपपत्र दाखल केले आणि न्यायालयाने दोषींना मृत्युदंडाची शिक्षा दिली", असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.

cm mamata banerjee
Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला बसणार धक्का, ५ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

अटक केलेल्या आरोपींची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, 'आम्ही या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. ही अतिशय संवेदनशील बाब आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती लवकरच देऊ. तिन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.'

cm mamata banerjee
School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com