Crime : प्रेमानंद महाराजांना भेटण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून धमकावले अन्...

Crime News : प्रेमानंद महाराजांना भेटवून देतो असे आमिष दाखवत एका व्यक्तीने महिलेची फसवणूक केली. बेशुद्ध करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. व्हिडीओ बनवून त्याने पीडितेचे शोषण केले.
Crime
Crimex
Published On
Summary
  • प्रेमानंद महाराजांना भेटवण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

  • गुंगीचे औषध देऊन आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आणि ब्लॅकमेल केले

  • महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत, पोलिस तपास सुरू

Shocking : श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील मथुरा येथे घडला आहे. वृंदावनातील राधा निवास येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आग्रा येथे राहणाऱ्या एका महिलेला आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांशी वैयक्तिक भेट देण्याचे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याला १२ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. पीडिता वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांची अनुयायी आहे. सोशल मीडियावर तिची भेट आरोपीशी झाली. चॅटिंग केल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाला. मी प्रेमानंद महाराजांचा भक्तांपैकी एक आहे आणि मला तुझी त्यांच्याशी भेट घडवून आणून देऊ शकतो असे आश्वासन आरोपीने पीडितेला दिले.

Crime
Student Death : सीनियरच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील NDA च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गूढ उकललं?

पीडिता तिच्या भावासह आग्राहून वृंदावनात आली. महाराजांचा आश्रम दूर आहे, तेथे वाहनांना परवानगी नाही असे आरोपीने महिलेच्या भावाला सांगितले आणि पार्किंगमध्ये कार घेऊन थांबायला लावले. आरोपी महिलेला दुचाकीवर घेऊन गेला. आश्रमाऐवजी तो पीडितेला राधाकृष्ण धाम नावाच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने कॉफी मागवली, कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकले.

Crime
Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

कॉफी प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीने पीडितेवर अनेकदा अत्याचार केले. त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ, चॅट रेकॉर्डिंग जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Crime
Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com