Shocking : रिंग रोडवर धक्कादायक प्रकार, तरूण जोडप्यानं विष प्राशन करुन संपवलं आयुष्य

Shocking News : प्रेमसंबंधांना कुटुंबीयांकडून होणाऱ्या विरोधामुळे एका तरूण जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारमध्ये दोघांनी विष प्राशन करत आयुष्य संपवलं.
Shocking
Shockingx
Published On
Summary
  • रिंग रोडवर तरुण जोडप्याने कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली.

  • प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने दोघांनी टोकाचा निर्णय घेतला.

  • बेशुद्ध अवस्थेत दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Shocking Incident : रिंग रोडवर एका जोडप्याने कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांचे दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. दोघांचे कुटुंबीय त्यांच्या नात्यावर नाराज होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. दोघांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या गोसाईगंज पोलीस स्टेशन परिसरातील आउटर रिंग रोडवर एका जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी कारमध्ये विष प्राशन केले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना याची माहिती दिले. ते घटनास्थळी पोहोचण्याआधीच दोघे बेशुद्ध झाले होते. रुग्णालयात नेल्यानंतर उपचार करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले.

Shocking
Cricketer Death : प्रसिद्ध कसोटीपटूचा मृत्यू, इंग्लंडमध्ये घेतला शेवटचा श्वास; क्रिकेट विश्वात शोककळा

मृत तरुणाचे नाव सुभाष रावत (वय २१ वर्षे) असे आहे. तो जानकीपुरम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अजनाहार येथील रहिवासी आहे. तो उदारनिर्वाहासाठी ओला कॅब चालवत असे. त्यांची प्रेयसी आलमबाग पोलीस स्टेशन परिसरात राहत होती. दोघांचे दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या नात्याला दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध होता.

Shocking
Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

घरच्या मंडळींनी केलेल्या विरोधामुळे त्यांनी विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच सुभाषने त्यांच्या कारचे लोकेशन त्याच्या भावाला पाठवले आणि विष प्राशन केल्याचे सांगितले. ही धक्कादायक माहिती मिळताच सुभाषचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह रुग्णालयातून ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Shocking
Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com