Shubhanshu Shukla  Saam Tv
देश विदेश

परीक्षेसाठी मित्राकडून पैसे; बहिणीच्या लग्नाच्यादिवशी अचानक झाला गायब, NDA मध्ये सिलेक्शन झाल्यावरच सांगितलं, Shubhanshu Shukla यांचा प्रवास

Shubhanshu Shukla Inspirational Story: भारतीय वंशाच्या शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात झेप घेतली आहे. त्यांनी एनडीएचा फॉर्म भरण्यासाठीही मित्राकडून उधारीवर पैसे घेतले होते.

Siddhi Hande

भारतीय वंशाचे शुभांशु शुक्ला यांनी नवीन विक्रम रचला आहे. आज Axiom-4 missionने अवकाशात भरारी घेतली आहे. या मिशनमध्ये शुभांशु शुक्ला आहेत. त्यांचे यान अवकाशात झेपावलं आहे. या मोहिमेअंतर्गत शुंभाशु आणि त्यांचे अनेक कर्मचारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान (ISS) कडे रवाना झाले आहेत.

कोण आहेत शुंभाशु शुक्ला? (Who is Shubhanshu Shukla)

शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे टोपननाव शुक्स (Shux) आहे. ते इंडियन एअर फोर्स टेस्ट पायलट आणि इस्त्रोचे अंतराळवीर आहेत. त्यांनी नॅशनल डिफेंस अकॅडमीमधून शिक्षण घेतले आहेत. त्यांनी इंडियन एअर फोर्स फास्टर स्ट्रीम जून २००६ च्या दलात नियुक्त झाले. त्यांच्याकडे २००० तास विमान चालवण्याचा अनुभव आहे. ते २०१९ मध्ये विंग कमांडर म्हणून प्रमोट झाले.

शुंभाशु यांचा प्रवास (Shubhanshu Shukla Success story)

शुंभाशु यांचे हवाई दलात काम करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी NDA च्या परीक्षेसाठी तयारी सुरु केली होती. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या परीक्षेबाबत कोणालाही सांगितले नव्हते. त्यांच्या कुटुंबियांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. शुभांशुच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत माहिती मिळाली.

२००१ मध्ये जेव्हा त्यांची मोठी बहीण शुचीचे लग्न होते. तेव्हा सर्वजण खूप आनंदात होते. परंतु शुभांशु यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.शुभांशू हे बहिणीच्या लग्नाच्या रात्री अचानक गायब झाले. जेव्हा ते सापडत नव्हते तेव्हा घरचे खूप अस्वस्थ होते.

काही तासानंतर शुभांशू हे परत घरी आले. तेव्हा ते खूप थकलेले दिसत होते. त्यानंतर ते पुन्हा लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. परंतु त्यांनी एनडीएच्या परीक्षेबाबत कोणालाच सांगितलं नाही. परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच त्यांनी याबाबत कुटुंबियांना सांगितले.

NDA चा फॉर्म भरण्यासाठी घेतले होते मित्राकडून पैसे (Shubhanshu Shukla Borrowed money from friend for NDA Form)

शुंभाशू यांची बहीण निधी मिश्रा यांनी याबाबत सांगितले की,NDA चा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मित्राकडून पैसे उधार घेतले होते. तो नेहमीच स्वतः ला इंडियन एअर फोर्समध्ये पाहत होता. त्याचे सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी घरी सांगितले. बहिणीच्या लग्नाच्या दिवशी अचानक गायब होण्यामागचे कारण त्या दिवशी सर्वांना समजले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Raj Thackeray : हे हिंदी हवं कशाला? स्टेशनच्या नावावरून राज ठाकरे भडकले, नेमकं काय घडलं ?

नवी मुंबईतील विमानतळाचं उद्घाटन कधी होणार? नाव काय देण्यात येणार? मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Dharashiv Floods: घरात चिखल, मुलांची वह्या-पुस्तके पाण्यात, आईच्या अश्रूचा बांध फुटला, काळजाला धस्स करणारा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करणार- मंत्री गुलाबराव पाटील

Royal Enfield: Bullet झाली २० हजारांनी स्वस्त! 'या' APPवरुन घरपोच सुविधा

SCROLL FOR NEXT