Manasvi Choudhary
शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत.
कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस (नासा) मोहिमसाठी निवड झाली आहे.
या अंतर्गत अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला आज अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
याचनिमित्ताने शुभांशु शु्क्ला कोण आहेत हे जाणून घेऊया.
मूळ उत्तर प्रदेश लखनौ येथील शुभांशु शुक्ला हे ३९ वर्षाचे आहेत.
शुंभाशु शुक्ला यांनी मागील १८ वर्षे भारतीय हवाई दलात कॅप्टन पदावर कार्य केले आहे.
शुभांशु शुक्ला यांना सुखोई -30 MKI, MiG-21S, MiG-29s, Jaguar, Hawks Dorniers आणि An-32 सारखी लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे.