Shraddha Walker News saam tv
देश विदेश

Shraddha Walker Case : श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांना सापडले महत्वाचे पुरावे; आबताब लटकणार!

श्रद्धा हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केल्यानंतर ते फ्रिजमध्ये साठवले होते.

Satish Daud

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केल्यानंतर ते फ्रिजमध्ये साठवले होते. सोयीनुसार तो ते तुकडे दिल्लीतल्या महरौली भागात फेकायचा. या सगळ्यामध्ये तिचं शीर त्याने कुठे टाकलं, हे कळत नव्हतं. दरम्यान, रविवारी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळालं आहे. पोलिसांनी मेहरौली जंगलातून एक कवटी आणि जबड्याचा काही भाग जप्त केला आहे.  (Latest Marathi News)

याव्यतिरिक्त पोलिसांना जंगलात अनेक हाडे सुद्धा सापडली आहे. मात्र, पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके आणि धड सापडलेले नाहीत. पोलीस अजूनही मेहरौलीच्या जंगलात शोध (Crime News) घेत आहेत. ही हाडे मानवाची आहेत की अन्य कोणाची हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही जप्त केलेली हाडे श्रद्धा वालकरची असल्याचे निष्पन्न झाल्यास या प्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना मदत मिळू शकते.

आता फॉरेन्सिक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. एका वरिष्ठ पोलीस  (Police) अधिकाऱ्याने सांगितले की दक्षिण जिल्ह्य़ातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आबताब हा जंगलात शोधमोहिमेदरम्यान पोलिसांशी सामान्य पद्धतीने बोलत होता, जणू काही घडलेच नाही असे तो दाखवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या कृत्याने स्वत: पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.

दरम्यान, आफताबने श्रद्धाचे शीर एका तलावात टाकले असल्याचा संशय पोलिसांना आहे. दिल्ली पोलीस आणि महापालिकेची टीम आज दिवसभर एक मोठे तलाव रिकामे करण्याच्या कामी लागली आहे. छतरपुर एनक्लेव येथील या तलावात आफताबने श्रद्धाचे शीर फेकले होते. आता ते शोधण्यासाठी पोलीस हे तलाव उपसत आहेत. सर्व पाणी काढून टाकल्यानंतर पोलिसांना श्रद्धाचे मुंडके हाती लागण्याची आशा वाटत आहे.

दिल्ली पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचे १७ हाडांचे तुकडे सापडले आहेत. ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हाडांचे तुकडे पाहून फॉरेन्सिक एक्स्पर्टचे म्हणणे आहे की ते मानवाचेच आहेत. ती हाडे श्रद्धाचीच आहेत हे सिद्ध करणे आता एक मोठे आव्हान बनले आहे. त्यासाठी डीएनए टेस्टिंगही केली जात आहे. या हाडांमध्ये जांघेतील हाड देखील आहे. या हाड़ांवर धारधार हत्याराने कापल्याचेही दिसत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : जसप्रीत बुमराह OUT, कुलदीप-अर्शदीप IN? निर्णायक कसोटीत भारताचे संभाव्य ११ शिलेदार

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT