Crime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती! पत्नीने केली पतीची हत्या; करवताने ६ तुकडे करून जंगलात फेकले

पश्चिम बंगालमधील एका महिलेनं आपल्याच मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSaam TV

Crime News : दिल्लीत घडलेल्या श्रद्धा हत्याकांड नंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील एका महिलेनं आपल्याच मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली. इतकंच नाही, हत्येनंतर पतीच्या शरीराचे ६ तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.

Uttar Pradesh Crime News
Milk Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका! दुधाच्या दरात पुन्हा वाढ, वाचा किती रुपयांनी महागलं दूध?

अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेचं पोलिसांनी छडा लावला आहे. उज्ज्वल चक्रवर्ती (वय ५५) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. उज्ज्वल हे माजी नौदल कर्मचारी होते. याप्रकरणी पोलिसांनी उज्ज्वल यांच्या पत्नी श्यामली चक्रवर्ती आणि मुलगा जॉय चक्रवर्ती यांना बेड्या ठोकल्या आहेत.  (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच उज्ज्वल यांच्याकडे मुलगा जॉय याने ३ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्यांनी देण्यास नकार दिला. यानंतर उज्ज्वल यांनी जॉय यांच्यात वाद झाला. या वादात जॉय याने उज्ज्वल यांना खुर्चीवरून ढकलून दिलं. खाली पडल्यानंतर उज्ज्वल बेशुद्ध झाले. त्यानंतर जॉय याने त्यांची गळा आवळून त्यांची हत्या केली.

Uttar Pradesh Crime News
Shraddha Walker case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांना शरीराचे १३ तुकडे सापडले, तिचं शीर...

करवताने केले वडीलांचे ६ तुकडे

आरोपी जॉय हा पॉलिटेक्निकमध्ये फर्नीचर क्राफ्टचे शिक्षण घेतो. त्याने सांगितले की, हत्येनंतर त्याने वडिलांना बाथरूममध्ये नेले. त्यानंतर आईसोबत मिळून त्याने उज्ज्वल यांच्या शरीराचे करवताने ६ तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे पिशवीत भरून ते जंगलातील वेगवेगळ्या भागात फेकले. हे तुकडे फेकण्यासाठी तो सायकलवर जात होता. पोलिसांनी सांगितले की, उज्ज्वल यांचे 2 पाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले. तर डोके व पोट देहिमदान मल्लातील एका तलावातून बाहेर काढण्यात आले.

उर्वरित अवयवांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, उज्ज्वल यांची हत्या केल्यानंतर जॉय आणि त्याच्या आईने पोलिसांत वडील हरवले असल्याची खोटी तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी उज्ज्वल यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा थागपत्ता लागला नाही. यानंतर पोलिसांनी जॉय आणि त्याच्या आईची कसून चौकशी केली. दोघांचेही बोलणे संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवल्या. पोलीस चौकशीत त्यांनी आपला गुन्हा मान्य केला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com