नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरू असून आज पुन्हा कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.
यात सुमारे 25 ते 26 गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
अपघातादरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.
अपघातस्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले आहेत सुमारे 12 ते 15 रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आलेल्या आहेत.
अपघातात एकूण २४ गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे.
नवले ब्रिजची ओळख सध्या अपघाती ब्रिज होतोना दिसत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.