Cryonics saam tv
देश विदेश

Cryopreservation : मृत व्यक्ती जिवंत होणार? 600 जणांचे गोठवले मृतदेह, पाहा स्पेशल रिपोर्ट

Cryopreservation News : आता एक वेगळी बातमी....समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि काही वर्षांनी जतन करुन ठेवलेला त्याचा मृतदेह जिवंत झाला तर...ऐकून आश्चर्य वाटतं ना....पण हे भविष्यात शक्य आहे असा दावा काही संशोधक करतायेत. पाहूया एक रिपोर्ट....

Girish Nikam

मृत व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत झाली तर, ही गोष्ट सध्या अशक्य वाटत असली, तरी एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत करता येईल, असा दावा काही कंपन्या करत आहेत. त्यासाठी मृतदेह दीर्घ काळ गोठवावे लागतील. या तंत्राला 'क्रायोनिक्स' असं नाव देण्यात आलं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्ती केवळ बेशुद्ध पडल्या आहेत, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.

आतापर्यंत जगभरातल्या 600 जणांचे मृतदेह क्रायोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे फ्रीज केले गेले आहेत. अमेरिका आणि रशियामध्ये सर्वाधिक 300 जणांचे मृतदेह गोठवले गेले आहेत. या तंत्रज्ञानात उणे 200 अंश सेल्सिअस तापमानात मानवी मृतदेह एका स्टीलच्या चेंबरमध्ये सुरक्षित ठेवला जातो. अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक देशांमध्ये काही कंपन्यांनी क्रायोनिक्स तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रयोगशाळा उभारल्या आहेत.

मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागते. मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचं काही तंत्र भविष्यात आले तर हे मृतदेह बाहेर काढून पुन्हा जिवंत केले जातील, असा दावा सदर्न क्रायोनिक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने काही काळापूर्वी केला होता.

या तंत्रज्ञानात मृतदेह स्टील चेंबरमध्ये उलटा ठेवला जातो. चेंबरमध्ये गळती झाली तर अशा वेळी मेंदू सुरक्षित राहण्यासाठी तसं केलं जातं. एखाद्या व्यक्तीचं मृत शरीर शक्य तितक्या लवकर गोठवलं गेलं तर ते पुनरुज्जीवीत होण्याची आशा अधिक. मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्यासाठी भारतात कोणताही स्पष्ट कायदा नाही. 2016मध्ये एका कॅन्सरग्रस्त तरुण मुलीने लंडन उच्च न्यायालयात एक अपील दाखल केलं होतं.

‘माझा मृत्यू होणार आहे. त्यामुळे मला पुन्हा जगण्याचा हक्क मिळायला हवा,’ अशी या तरुण मुलीची मागणी होती. आगामी काळात मृतांना जिवंत करण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल आणि आपल्या मुलीला नवजीवन मिळेल, असा विश्वास तिच्या कुटुंबीयांना होता. आता अशा कुटुंबियांची संख्या वाढतेय. मृत्यूनंतर पुन्हा जगण्याची इच्छा पूर्ण होणार का? माणूस विज्ञानाच्या ताकदीवर मृत्यूवर मात करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT