मुंबई : कोरोना विषाणू (Corona Virus) महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्राचे (education department) जबरदस्त नुकसान झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून शाळा (Schools), कॉलेजेस (Colleges) बंद आहेत. या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता शिक्षण विभागाने परीक्षा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द (10th and 11th exam canceled) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राज्यसरकारने (State Government) अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याना अकरावीत प्रवेश (Eleventh Admission) घेण्यापूर्वी प्रवेश परीक्षा (Entrance exam) द्यावी लागणार आहे. दहावीच्या निकालानंतर परीक्षेचे अर्ज उपलब्ध होतील. (A written test will have to be taken before admission to the Eleventh; Department of Education)
राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमाआधारे इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Scince) आणि सामाजिकशास्त्र (Sociology) या विषयांच्या लेखी परीक्षा (written exam) होणार आहे. विशेष म्हणजे सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक आहे. परीक्षा ऐच्छिक असली तरी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये ही परीक्षा होईल. प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्याना अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर राहिलेल्या रिक्त जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.
विशेष म्हणजे, सीबीएसई (CBSE)सह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (National and International) आणि खासगी मंडळाच्या विद्यार्थ्यंनाही ही परीक्षा देता येणार आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अकरावी प्रवेश परीक्षेच्या आयोजनासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या प्रत्येक विषयांचे 25 गुणांची एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. यात बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न असतील. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्याना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र सीबीएसई आणि इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.