ओबीसींच्या मुद्द्यावर खडसेंच्या घरात खटके; नणंद-भावजय आमने- सामने

राज्यात काही दिवसांपासून ओबीसीच्या आरक्षणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलीच ठिणगी पेटली आहे.
ओबीसींच्या मुद्द्यावर खडसेंच्या घरात खटके; नणंद-भावजय आमने- सामने
ओबीसींच्या मुद्द्यावर खडसेंच्या घरात खटके; नणंद-भावजय आमने- सामनेSaam Tv
Published On

जळगाव : राज्यात काही दिवसांपासून ओबीसीच्या OBC आरक्षणावरून reservation सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. जळगाव Jalgaon जिल्ह्यामध्ये देखील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलीच ठिणगी पेटली आहे. खडसे कुटुंबात नणंद व भावजय यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. Word war erupt between khadse family over obc reservation

राष्ट्रवादीचे NCP रोहीणी खडसे यांनी, ‘भाजपला BJP कधीपासून ओबीसींचा कळवळा येत आहे’ या विषयी ट्वीट केल, असता त्यावर भाजपचे खासदार रक्षा खडसे यांनी, 'रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या सदस्या असल्यामुळे, त्यांना पक्षाने सांगितले असावे, म्हणून त्या बोलत असाव्यात', असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

हे देखील पहा-

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या घरामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन नणंद- भावजय यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळत आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपकडून सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

यानंतर रोहिणी खडसे यांनी ट्विट Tweet करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 'भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागल आहे. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवत असताना हा कळवळा कुठे गेला होता. आता या आरक्षणाच्या मुद्यावर गळा काढण्यात अर्थ नाही', अशा प्रकारचं ट्वीट रोहिणी खडसे यांनी यावेळी केले आहे. रोहिणी खडसेच्या टीकेला भाजपचे खासदार रक्षा खडसे यांनीही पत्रकारांशी बोलताना जोरदार टिकात्मक उत्तर त्यांनी दिले आहे. Word war erupt between khadse family over obc reservation

ओबीसींच्या मुद्द्यावर खडसेंच्या घरात खटके; नणंद-भावजय आमने- सामने
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला खानदेशात दुसरा मोठा धक्का

रोहिणी खडसे हे राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितले असेल, तसे त्या बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केल पाहिजे, नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल करू नका, त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे आवश्यक असल्याचे खासदार खडसे यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com