Nitesh Rane : 'शिवरायांचे मावळे मुस्लीम नव्हते'; नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन राजकारण पेटलं, VIDEO

Nitesh Rane News : मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय.. नेमकं राणे काय म्हणाले आहेत आणि त्याचे कसे पडसाद उमटलेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
nitesh rane News
nitesh rane Saam tv
Published On

मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम मावळे नसल्याचं वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलंय..नितेश राणे इथेच थांबले नाहीत तर शिवाजी महाराजांची लढाई ही इस्लामविरोधातील होती, असा दावाही त्यांनी केलाय..

नितेश राणेंचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर अजित पवारांनी राणेंची कानउघडणी केलीय.. तर राऊतांनीही नितेश राणेंची शाळा घेत थेट पंतप्रधानांच पत्र लिहीण्याचा इशारा दिलाय..

शिवरायांचा दारुगोळा कोण सांभाळत होतं? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तर बखरी चाळा, समजून घ्या आणि मग बोला, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

nitesh rane News
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचं आवडतं शस्त्र कोणतं होतं?

शिवरायांचा चरित्र ग्रंथ, बखरी, शिवकालीन पत्र आणि पाश्चिमात्य इतिहासकारांनी ठेवलेल्या नोंदीवर नजर टाकली तर शिवरायांच्या पदरी मुस्लीम सैनिकच नाही तर विविध दलांचे प्रमुखही असल्याचं स्पष्ट होतंय..

शिवरायांचे मुस्लीम मावळे

सभासद बखरीत मदारी मेहतर या मुस्लीम मावळ्याचा उल्लेख

शिवरायांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान असल्याचा चिटणीसांच्या बखरीत उल्लेख

शिवरायांचा वकील काझी हैदर असल्याचा शेजवलकरांकडून उल्लेख

शिवकालीन पत्रांमध्ये आरमार प्रमुख दौलतखानाचा उल्लेख

नुरखान बेग हा पायदळाचा प्रमुख असल्याचा 10 मार्च 1657 चा उल्लेख

सिद्धी हिलाल घोडदलात सेनापती असल्याचा बखरीत उल्लेख

शिवरायांकडे 700 पठाणांची फौज असल्याचीही माहिती

nitesh rane News
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे कोण होते? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आठरापगड जातीचे, आणि विविध धर्मांचे होते.. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आक्षेप घेऊन शिवाजी महाराजांना संकूचित करण्याचा प्रयत्न सुरु आहे का? याचीच चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com