Unemployment Engineer :  Saam tv
देश विदेश

Unemployment Engineer : ८३ टक्के इंजिनीअर बेरोजगार; धक्कादायक कारण आलं समोर

Unemployment Engineer news : ८३ टक्के इंजिनीअर बेरोजगार असल्याचे रिपोर्टमधून उघड झालं आहे. इतके टक्के इंजिनीअर बेरोजगार का आहेत, याचे कारणही समोर आलं आहे.

Vishal Gangurde

पदव्यांचं महत्व कमी होऊ लागल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. एका नव्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८३ टक्के इंजिनीअर आणि ४६ टक्के बिझनेस ग्रेजुएट्स उमेदवारांना नोकरी आणि इंटर्नशिपची ऑफर मिळणे अवघड झाले आहे. कंपन्या आता चांगल्या कॉलेजपेक्षा उमेदवारांच्या कौशल्याला महत्व देऊ लागल्या आहेत.

रिपोर्टनुसार, ७३ टक्के रिक्रुटर्स आता उमेदवारांच्या पदव्यांऐवजी कौशल्यावर भर देऊ लागले आहेत. यामुळे काही तरुणांना फायदा होऊ लागला आहे. नवं कौशल्य अवगत करणाऱ्यांना तरुणांना अधिक फायदा होत आहे.

GenZ प्रोफेशनल्समधअये फ्रिलांसिंग आणि साइड हसल्सची क्रेझ वाढू लागली आहे. रिपोर्टनुसार, ५१ टक्के GenZ युवा अधिकच्या कमाईसाठी फ्रिलांसिंगकडे वळू लागले आहेत. बिझनेस स्कूलचे विद्यार्थ्यांचा आकडा ५९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

काही क्षेत्रात पगाराच्या बाबतीत समानता पाहायला मिळत आहे. परंतु आर्ट्स आणि सायन्स पदवीधर उमेदवारांमध्ये पगारांमध्ये फरक पाहायला मिळत आहे. महिला प्रोफेशनलला वार्षिक ६ लाखांचं पॅकेज मिळत आहे. तर पुरुषांना त्याहून अधिकचं पॅकेज मिळत आहे. बी-स्कुल आणि ई-स्कूलच्या उमेदवारांच्या पगारांमध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे.

कामाच्या ठिकाणी GenZ आणि रिक्रूटर्समध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. ७७ टक्के युवकांना कामगिरीचं पुनरावलोकन महिन्याला व्हावे, अशी इच्छा आहे. तर ७१ टक्के रिक्रूटर्स वार्षिक कामगिरीचं पुनरावलोकनला (performance rview) प्राधान्य देत आहे. रिपोर्टनुसार, इंजिनीअरचे विद्यार्थी ह्यूमन रिसोर्सेज सारख्या क्षेत्राला प्राधान्य देऊ लागले आहेत. २०२४ साली एक चतुर्थांश पदवी पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांनी विना मोबदला इंटर्नशिप केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT