Desk Job Risks: तासनतास बसून काम करण्याचे दुष्परिणाम; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Piriformis Syndrome: बदलत्या जीवनशैलीमुळे लोक स्वप्नांच्या मागे लागले आहेत. त्यासाठी लोक तासंतास काम करणं पसंत करायला लागलेत. याचा कालावधी सध्या ९ तासांचा आहे. त्यामुळे अनेकांना शरीराच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
Desk Job Risks: तासनतास बसून काम करण्याचे दुष्परिणाम; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
Published On

प्रत्येक जण स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो. मोठा पगार तशी कामाची मोठी वेळ असते. लोक तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करत असतात. तसचं सध्या लोक संगणक लॅपटॉप अशा माध्यमांवर मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यामुळे त्यांना एका जागी बसून काम करावं लागतं. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. काही लोक आळशी होतात, काही लोक चालणं पसंत करत नाहीत, काही लोकांना डोळ्यांचा त्रास होतो, काहींना अपचनाचा त्रास होतो. याचे रुपांतर पुढे गंभीर आजारात होतं.

Desk Job Risks: तासनतास बसून काम करण्याचे दुष्परिणाम; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
Holi Born: होळीच्या दिवशी जन्मलेले लोक खरोखर लकी असतात का?

कोरोनाच्या काळात लोक वर्क फ्रॉम होम घ्यायला लागले. तेव्हा पासून तो एक कामाचा नविन ट्रेंड आला असं आपण म्हणू शकतो. पण यामध्ये बऱ्याच जणांना घरात एका ठिकाणी बसून तासंतास काम करण्याची सवय लागली. यामुळे हिप फ्लेक्सर्स आणि स्नायू कडक होऊ शकतात. याने तुमच्या शरीरातील पिरिफॉर्मिस या स्नायूवर परिणाम होऊ शकतो.

तर अनेक हाडांच्या समस्यांना सामोरे जाऊ शकतात. जर तुमच्या पिरिफॉर्मिस स्नायुवर दबाव आला तर तुम्हाला पिरिफॉर्मिस सिंड्रोमसारख्या आजारांचा धोका वाढतो. तर तुम्ही एका जागी सलग बसलात तर तुम्हाला स्नायुंशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं.

पिरिफॉर्मिस सिंड्रोमची लक्षणे कोणती?

सायटिका सारखी वेदना

तुम्ही जर एका जागेवर बसून असाल तर तुमच्या पायाच्या खालच्या भागात म्हणजे मांडीपासून ते पायापर्यंत ही वेदना होते. जी पिरिफॉर्मिस स्नायू सायटॅटिक समस्या मज्जातंतूवर दबाव पडल्याने उद्भवू शकते.

पायाला मुंग्या येणे किंवा पाय सुन्न पडणे

एका जागी बसल्याने तुमच्या पायात मुंग्या येतात. ही समस्या तुमच्यासाठी काही नविन नसेल. पण ही समस्या सायटॅटिक नर्व्हच्या जळजळीमुळे घडत असते. त्यांना पायामध्ये कालांतराने सुन्न पणा जाणवू शकतो.

हालचाल करताना वेदना होणे

तुम्ही जर लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमच्या हाताचे कोपरे मनगट दुखण्याची समस्या तुम्हाला उद्भवू शकते. त्यात तुम्ही पाय दुमडून बसत असाल तर तुम्हाला पायांची हालचाल करताना अनेक समस्या जाणवू शकतात.

यावर उपचार काय?

तुमचं काम जरी एका जागी बसून असेल तरी तुम्ही तासाभराने चालायला जाणं गरजेचं आहे. त्याने तुमच्या मेंदूला ताण जाणवत नाही. तर घरी गेल्यावर तुम्ही किमान १५ मिनिटे स्ट्रेचिंग करू शकता. जेवल्या नंतर शतपावली करा. ताठ बसा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Desk Job Risks: तासनतास बसून काम करण्याचे दुष्परिणाम; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
Summer Diet: उन्हाळ्यात डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा? जाणून घ्या संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com