Summer Diet: उन्हाळ्यात डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा? जाणून घ्या संपूर्ण यादी

Healthy Foods: उन्हाळा जवळ आला की शरीराला पाण्याची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते. तसेच तुम्ही योग्य आणि हलका आहार घेणे सुद्धा फायदेशीर असते. तुम्ही तुमच्या डाएटकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे.
उन्हाळ्यातील आहार
Summer dietgoogle
Published On

भारतात उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली आहे. एकदा का होळी झाली की, इथे ऊन लागायला सुरुवात होते. अशा भयंकर वातावरणात तुम्ही तुमच्या डाएटकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. तुमच्या रोजच्या आहारात ऋतूनुसार बदल केला तर तुम्हाला एक हेल्दी लाईफ जगता येतं. उन्हाळ्यात तुम्ही हिवाळ्यात खाल्ले जाणारे पदार्थ खाणं थांबलं पाहिजे. त्याने तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते.

उन्हाळ्यातील आहार
Holi Born: होळीच्या दिवशी जन्मलेले लोक खरोखर लकी असतात का?

गर्मीमध्ये डाएट कसे असावे?

उन्हाळ्यात शरीराला सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची. तुम्ही जर पाणी भरपुर प्रमाणात प्यायलात तर उन्हामुळे होणारा कोणताही त्रास तुमच्या आजुबाजूला फिरकतही नाही. तसेच चक्कर येणे किंवा विकनेस सुद्धा कमी प्रमाणात जाणवतो. अशातच तुम्ही फळांचा समावेश आहार करणे फार महत्वाचे असते. त्यात कलिंगड, गाजर, काकडी, नारळ पाणी, विविध फळांचे ज्युस हे पदार्थ तुमच्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतात.

उन्हाळ्यात खाण्यात काय बदल करावेत?

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात तुम्ही डायड्रेटेड राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही योग्य आहार घेणे गरजेचे आहे. त्यात दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी न विसरता पिण्याचा सल्ला ते देतात. तसेच शरीराला थंड आणि पचनासाठी हलके असे पदार्थ खाण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात. त्यात कलिंगड, गाजर, काकडी, नारळ पाणी हे महत्वाचे घटक मानले जातात. हे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समावेश करू शकता.

उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत?

उन्हाळ्यात तुम्ही गरम पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. त्यासोबत तुम्ही तेलकट आणि तिखट पदार्थ खाऊ नयेत. त्याने तुम्हाला अपचनाचा जास्त त्रास होऊ शकतो. तसेच तुम्ही उन्हातून प्रवास करून घरी गेल्यावर लगेच थंड पाणी किंवा ज्युसचे सेवन करू नका. त्याने तुम्हाला लगेचच सर्दी-ताप होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. खाण्यासोबत तुम्ही स्वच्छता सुद्धा राखली पाहिजे. उन्हाळ्यात तुम्ही रोज स्वच्छ आणि सुती कपडे कपडे वापरावेत. तसेच बाहेर प्रवास करत असताना तुम्ही स्कार्फ किंवा टोपीचा वापर केला पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

उन्हाळ्यातील आहार
Brain Health: सकाळी पाणी पिण्याचा अद्भुत फायदा; मेंदू होईल अधिक सक्रिय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com