Brain Health: सकाळी पाणी पिण्याचा अद्भुत फायदा; मेंदू होईल अधिक सक्रिय

Hydration and Brain Function: तुमची विचार करण्याची क्षमता चांगली असेल तर भविष्यात यश मिळवणं सोप्प असतं. सध्या लोक त्यांच्या कमी वयातच गोष्टी विसरायला लागले आहेत.
 Hydration and Brain Function सकाळी पाणी पिण्याचा अद्भुत फायदा; मेंदू होईल अधिक सक्रिय
Brain Healthgoogle
Published On

तुमची विचार करण्याची क्षमता चांगली असेल तर भविष्यात यश मिळवणं सोप्प असतं. सध्या लोक त्यांच्या कमी वयातच गोष्टी विसरायला लागले आहेत. एखादा व्यक्ती जर कोणत्या गोष्टी वारंवार विसरत असेल तर ती भविष्यात एक मोठी समस्या असू शकते. त्यात जर कॉग्निटिव फंक्शन योग्य असेल तरच तुमचं दैनंदिन आयुष्य चांगलं चालू शकतं. कॉग्निटिव म्हणजे विचार करण्याची क्षमता असा आहे. हा मेंदू आणि शरीराशी जुळलेला असतो.

 Hydration and Brain Function सकाळी पाणी पिण्याचा अद्भुत फायदा; मेंदू होईल अधिक सक्रिय
Office Style for Women: कामाच्या ठिकाणी बदला कपड्यांची स्टाईल, एक्सपर्टने सांगितल्या महिलांसाठी खास टिप्स

वाढत्या वयानुसार लोकांना गोष्टी जास्त लक्षात राहत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, हायड्रेशन हा घटक तुमच्या शरीरात कमी असेल तर तुम्हाला विसरण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. म्हणजेच तुम्ही जर योग्य प्रमाणात शरीराला आवश्यक असेल तितके पाणी प्यायलात तरच तुमचा मेंदू योग्य रित्या काम करणार आहे. तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय परिणाम करू शकतात, जन्म किंवा वय यावर कोणचेही बंधन नाही. हे केल्याने तुम्हाला आनंदी जीवन जगता येऊ शकतं. सुरुवात सकाळपासूनच झाली तर उत्तम होईल.

प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूचा भाग हा ७५ टक्के पाण्याने बनलेला आहे. त्यामुळे तुम्ही सतत पाणी प्यायलात तरच तुम्हाला हायड्रेशनचं प्रमाण योग्य रित्या राखता येईल. २०१९ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्चमध्ये एक संशोधन पत्र प्रकाशित झाले. यामुळे अनेक गोष्टी समजल्या. त्यात पाण्याचे सेवन केल्याने व्यक्तीच्या मन:स्थितीवर होणारे परिणाम तपासले गेले.

त्यात १२ तासांच्या रात्रीच्या उपवासानंतर दूसऱ्या दिवशी सकाळी ८: ०० वाजता चाचणी घेतली गेली. त्यासाठी त्यात उंची, रक्तदाब, आणि मूत्र याची चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना ३६ तास पाणी पिण्याची परवानगी नव्हती. याचा परिणाम नकारात्मत झाला. त्यात अल्पकालीन स्मृती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झालेली आढळली. त्यामुळे तुम्ही जितके पाण्याचे सेवन कराल तितकी तल्लख बुद्धी तुम्हाला मिळणार आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

 Hydration and Brain Function सकाळी पाणी पिण्याचा अद्भुत फायदा; मेंदू होईल अधिक सक्रिय
Soaked Anjeer Benefits: रात्री वेळेवर झोप लागत नाही? मग करा 'या' घरगुती पेयाचे सेवन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com